शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
4
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
5
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
6
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
7
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
8
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
9
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
10
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
11
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
12
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
13
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
14
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
15
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
16
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
17
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
18
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
19
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...

Water cup compitation : श्रमदानातून पान्हेरा ग्रामस्थांचे दुष्काळाशी दोन हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 18:16 IST

धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील पान्हेरा येथील गावकरी दुष्काळाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाले असून पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेनिमित्त प्रत्यक्ष श्रमदानास गावकºयांनी प्रारंभ केला आहे.

धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील पान्हेरा येथील गावकरी दुष्काळाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाले असून पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेनिमित्त प्रत्यक्ष श्रमदानास गावकºयांनी प्रारंभ केला आहे.लोकांच्या मनसंधारणातून जलसंधारणाकडे वळविणाºया व त्यातून शेकडो खेडी पाणीदार करणाºया सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला ८ एप्रिल रोजी राज्यात प्रारंभ झाला. मोताळा तालुक्यातील १३ गावे यावर्षी या स्पर्धेत सहभागी झालेली आहेत. ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता पान्हेरा गावकºयांनी प्रत्यक्ष श्रमदानास सुरुवात केली. गावालगतच्या शिवमळा टेकडीवर गावकरी प्रत्यक्ष श्रमदान करीत आहे. त्यामध्ये अबालवृद्ध, महिला, पुरुष उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. गावकºयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग, तालुका प्रशासन नियमीत गावकºयांना मार्गदर्शन करीत आहे.   गावातील युवक विजय भगत, वैभव चौधरी, प्रतिक किन्होळकर, भारत वैराळकर, सुधाकर लोटकर, उमेश वैराळकर यांनी पाणी फाऊंडेशन तर्फे आयोजित प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. गावात सध्या युवकाची चमू जनजागृती व प्रचार, प्रसार करीत आहे. गावामध्ये गट-तट व राजकीय भेद विसरुन गावकरी एकत्र आले आहे. महिलांचा मोठा सहभाग, प्रशासनाची साथ, युवकांचे काटेकोर नियोजन यामुळे पान्हेरा वासियांची वाटचाल गाव पाणीदार करण्याकडे सुरू आहे. तसा संकल्पच गावकºयांनी केला आहे. सकाळीच पान्हेरा ग्रामस्थ शिवमळा टेकडीवर श्रमदानासाठी एकत्र येतात. यामाध्यमातून दुष्काळ कायमचा हद्दपार करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. जलसंधारणाची मोठी कामे या गावात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. 

पाण्याचे नियोजन करणारी ग्रामपंचायतसार्वजनिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत कुठलाही भेदभाव न करता एकसमान वाटप व्हावे यासाठी सरपंच सुनिल वैराळकर व पदाधिकाºयांनी फक्त अर्धा इंची कनेक्शनद्वारे गावकºयांना घरोघरी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याची काटेकोर अंमलबजावणी गावात केली. त्यामुळे समान कनेक्शनद्वारे पाणीपुरवठा करणारी पान्हेरा ग्रामपंचायत ही तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा