शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुलासह बंधाऱ्यांमुळे जलसंधारणाला गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 18:41 IST

पहिल्याच पावसात या पूलासह बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून जलसंधारणाला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात पहिलाच पुलासह बंधारा बांधण्याच्या उद्देशाचे फलित झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देकाथरगाव येथे उभारण्यात आलेल्या पुलासह बंधाºयाला प्रत्येकी ६ मीटरचे ५ गाळे आहेत. या बंधाºयात पहिल्याच पावसात मोठ्याप्रमाणात पाण्याची साठवणूक झाली. सिंचन आणि पिण्याचे किंवा उद्योगाच्या हेतूसाठी या पाण्याचा उपयोग होवू शकतो.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे जतन आणि वाहतूक अशा तिहेरी उद्देशाने संग्रामपूर तालुक्यातील  काथरगाव येथे पहिलाच पुलासह बंधारा बांधण्यात आला. पहिल्याच पावसात या पूलासह बंधाºयात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून जलसंधारणाला गती मिळाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात पहिलाच पुलासह बंधारा बांधण्याच्या उद्देशाचे फलित झाल्याचे दिसून येते. खालावलेली जलपातळी वाढविण्यासाठी तसेच पाणलोट व्यवस्थापनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील पूलासह बंधाºयाच्या धर्तीवर काथरगाव पूल (तालुका संग्रामपूर) येथे पहिलाच पुलासह बंधारा उभारण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोदतंर्गत या बंधाºयाचे एका महिन्याच्या कालावधीत विक्रमी वेळेत बांधकाम पूर्णत्वास नेण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अमरावती विभागातील पहिलाच पुलासह बंधारा काथरगाव येथे बांधण्यात आला. या बंधाºयात पहिल्याच पावसात मोठ्याप्रमाणात पाण्याची साठवणूक झाली असून, काथरगाव येथील नागरिकांना दळणवळणाचीही सुविधाही निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल थोटांगे, जळगाव जामोदचे उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनात या पुलासह बंधाºयाचे बांधकाम तडीस नेण्यात आले. 

अशी आहे पुलासह बंधाºयाची रचना!बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथे उभारण्यात आलेल्या पुलासह बंधाºयाला प्रत्येकी ६ मीटरचे ५ गाळे आहेत. पुलाची लांबी ३० मीटर असून, बंधाºयाची उंची २ मीटर आहे. तर राफट फाउंडेशन पध्दतीने पायव्याची उभारणी केली आहे. काथरगाव पुलासह बंधाºयाच्या उभारणीसाठी २५ हजार ७८७ रुपयांप्रमाणे प्रतीमीटर खर्च लागला.

३.१५ कोटी लीटर्स साठवणूक क्षमता!काथरगाव येथील पुलासह बंधाºयाचे बांधकाम विक्रमीवेळेत म्हणजेच सुमारे एक महिन्याच्या कालावधीत पूर्णत्वास नेण्यात आले. बंधाºयाची पाणी साठवण क्षमता ३.१५ कोटी लीटर्स एवढी आहे. या बंधाºयामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यास मदत होवू शकते. त्याचप्रमाणे सिंचन आणि पिण्याचे किंवा उद्योगाच्या हेतूसाठी या पाण्याचा उपयोग होवू शकतो. जागेवर बांधण्यात आलेला पहिलाच बंधारा!सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव पी.एल.बोंगीरवार यांच्या संकल्पनेत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे (प्रीकास्ट स्वरूपातील) पहिला पूलासह बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा निर्मिती करताना बाहेर पुनरूत्पादनक्षम  (कान्क्रीट) तयार करण्यात आले. नंतर त्याची मूल येथे जुळवणी करण्यात आली. मात्र, काथरगाव येथे जागेवरच पुलासह बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे जागेवर बांधण्यात आलेला काथरगाव हा राज्यातील एकमेव पुलासह बंधारा ठरतोय. काथरगाव येथील बंधाराही सेवानिवृत्त सचिव पी.एल.बोंगीरवार यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आला. 

 काथरगाव येथे अमरावती विभागातील पहिलाच पूलासह बंधारा उभारण्यात आला. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या पुलासह बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील बंधारा हा ह्यप्रीकास्टह्णस्वरूपातील असून, काथरगाव येथे जागेवरच पुलासह बंधाºयाची निर्मिती करण्यात आली आहे.- राजेश एकडेशाखा अभियंता, सा.बा.विभाग, जळगाव जामोद

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाDamधरण