बुलडाण्यातील कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:05 PM2019-07-03T14:05:23+5:302019-07-03T14:05:29+5:30

बुलडाणा : शहरातून दैनंदिन संकलित केला जाणारा कचºयावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया करून डपिंग ग्राऊंडमधील ८० टक्के जागा मोकळी केल्या जाईल.

waste management plant in buldhana | बुलडाण्यातील कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन होणार!

बुलडाण्यातील कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन होणार!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहरातून दैनंदिन संकलित केला जाणारा कचरा हा हनवतखेड येथील डंपिंग ग्राऊंडवर न साठवता या कचºयावर तसेच साठलेल्या जुन्या कचºयावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया करून डपिंग ग्राऊंडमधील ८० टक्के जागा मोकळी केल्या जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. डंपिंग ग्राऊंडमुळे हनवतखेड येथील नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका व बुलडाणा शहरातील घन कचरा व्यवस्थापन या अनुषंगाने आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
बुलडाणा शहरातून दररोज तब्बल १७ मेट्रीक टन कचरा संकलित केला जातो. शहरातून संकलित केलेला हा कचरा सद्यस्थितीत हनवतखेड नजीकच्या डंपिंग ग्राऊंडवर साठवला जातो. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून आजार फैलण्याची शक्यता लक्षात घेता हनवतखेड येथील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात तेथील नागरिकांनी हा कचरा डेपो हटविण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रयत्नातून २०१८ मध्ये बुलडाणा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी साडेचार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी एक कोटी ३२ लक्ष रूपयांचा निधी सुध्दा नगर परिषदेस प्राप्त झालेला आहे. मात्र नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे २५ घंटागाड्यांच्या खरेदीव्यतिरिक्त घन कचरा व्यवस्थापनाच्या इतर अनुषंगिक कामांमध्ये नगर परिषद प्रशासनास सारस्य असल्याचे दिसून येत नाही. यापार्श्वभूमीवर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बुलडाणा शहराच्या व जनहिताच्या समस्यांबाबत निर्ढावलेल्या नगर परिषदेस चांगलेच धारेवर धरले आहे. त्याअनुषंगानेच मंगळवारी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा शहराचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व डंपिंग ग्राऊंडवरील शास्त्रीय प्रक्रीया याबाबत तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाणा शहरातून दैनंदिन संकलित केल्या जाणाºया १७ मेट्रीक टन कचºयावर यापुढे शास्त्रीय पध्दतीने प्रक्रीया करून डंपिंग ग्राउंडमधील ८० टक्के जागा रिकामी करण्यात येईल असे सांगितले. त्यासाठी आवश्यक असलेली स्थापत्य विषयक कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही दिली आहे. या प्रश्नामुळे बुलडाणा शहरातील घनकचरा संकलन व शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीयेचा गंभीर प्रश्न मार्गी लागणार असून हनवतखेडवासियांना सुध्दा दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: waste management plant in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.