शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : मानोरा तालुक्यात पोलिस बंदोबस्तात २१ लोटाबहाद्दरांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 19:52 IST

मानोरा (वाशिम) : जिल्हा परिषद व मानोरा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावांमध्ये ३१ जानेवारीला पहाटे मेगा गुडमॉर्निंग पथक सक्रीय करून पोलिस बंदोबस्तात उघड्यावर शौचास जाणाºया २१ लोटाबहाद्दरांवर धडक कारवाई करण्यात आली. 

ठळक मुद्दे मेगा गुडमॉर्निंग पथक सक्रीय मानोरा तालुक्यात धडक मोहिम

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : जिल्हा परिषद व मानोरा पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गावांमध्ये ३१ जानेवारीला पहाटे मेगा गुडमॉर्निंग पथक सक्रीय करून पोलिस बंदोबस्तात उघड्यावर शौचास जाणा-या २१ लोटाबहाद्दरांवर धडक कारवाई करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, गटविकास अधिकारी सुरज गोहाड व पोलिस उपनिरीक्षक विश्वास वानखडे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पोलिस विभागाच्या कर्मचारी पथकाने आज तालुक्यातील ग्राम आसोला खुर्द, सोमेश्वर नगर, पोहरादेवी, वाईगौळ व माहुली येथे पहाटे पाच वाजतापासून तळ ठोकला. यादरम्यान उघड्यावर शौचास जात असताना २१ जण आढळून आले. संबंधितांवर मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १५, १६, १७ अन्वये गुन्हा नोंदवून दंड वसूल करयात आला. संपूर्ण वाशिम जिल्हा  येत्या २८ फेबु्रवारीपर्यंत हगणदरीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला असून अद्याप जिल्ह्यात १० हजार शौचालयांचे बांधकाम होणे बाकी आहे. मानोराला लागुन असलेले कारंजा आणि मंगरुळपीर ही दोन्ही तालुके आजमितीस हगणदरीमुक्त झाली आहेत. त्या धर्तीवर मानोरा तालुकाही हगणदरीमुक्त करण्यासाठी उघड्यावर शौचास जाणाºयांवर यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी इस्कापे यांनी सांगितले. मेगा गुडमॉर्निंग पथकात जिल्हा स्वच्छता कक्षाचे आंबेकर,  दुधाटे,   घुले, मानोरा पंचायत समितीचे मिनी बिडीओ सतीश नायसे, संजय भगत, वाघमारे, व्यवहारे, बेलखेडकर, देवेंद्र इंगोले, गजेंद्र चिंतावार, आखाडे, बोंडे, सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश होता. 

टॅग्स :washimवाशिम