प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:34+5:302021-02-05T08:32:34+5:30

रायपूर गावाला विविध समस्यांनी ग्रासलेले असून या समस्या सोडवण्यासाठी २६ जानेवारीपासून लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय ग्रामपंचायत ...

A warning to fast on Republic Day | प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्याचा इशारा

प्रजासत्ताकदिनी उपोषण करण्याचा इशारा

रायपूर गावाला विविध समस्यांनी ग्रासलेले असून या समस्या सोडवण्यासाठी २६ जानेवारीपासून लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय ग्रामपंचायत सदस्य शालीकराम काळे व सागर वाहेकर या सदस्यांनी घेतला आहे. रायपूर गावातून जाणारा हिवरा आश्रम ते जानेफळ रस्ता धोकादायक ठरत आहे. अनेक दुचाकीधारकांचे अपघात होऊन गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर रस्त्यावरून घाण पाणी वाहत आहे. सिमेंट काँक्रिटचा रस्ता ग्रामपंचायतने तयार केलेला होता. त्यावरदेखील अतिक्रमण वाढले आहे. या सिमेंट काँक्रिट रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे, गावातील मुख्य रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे, गावातील नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, गावातील घाण, कचरा याची नियमित स्वच्छता करण्यात यावी, या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे.

Web Title: A warning to fast on Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.