वर्दडीत घराची भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:37 IST2021-08-23T04:37:01+5:302021-08-23T04:37:01+5:30

वर्दडी येथे वॉर्ड क्रमांक दोनमध्ये विठ्ठल शेषराव खंदारे यांचे राहते घर आहे. दोन मुले, पत्नी, सून व नातवंडे असा ...

The wall of the house collapsed. Fortunately, no casualties were reported | वर्दडीत घराची भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली

वर्दडीत घराची भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली

वर्दडी येथे वॉर्ड क्रमांक दोनमध्ये विठ्ठल शेषराव खंदारे यांचे राहते घर आहे. दोन मुले, पत्नी, सून व नातवंडे असा परिवार या घरामध्ये राहतो. २१ ऑगस्टला पाऊस सुरू असताना त्यांची नातवंडे ही घरात खेळत होती. याच दरम्यान पावसाचे पाणी भिंतीत मुरल्यामुळे ही भिंत बाहेरील बाजूला पडली. त्यामुळे घरातील बालके थोडक्यात बचावली. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक तिकडे धावो व खंदारे कुटुंबीयांना मदत केली. यामुळे खंदारे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त घराचा पंचनामा करून संबंधित विभागाने नुकसान भरपाई द्यावी किंवा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ द्यावा, अशी मागणी विठ्ठल खंदारे यांनी केली आहे. नुकसानग्रस्त घराची पाहणी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: The wall of the house collapsed. Fortunately, no casualties were reported