भिंत कोसळून एक ठार
By Admin | Updated: August 14, 2015 00:34 IST2015-08-14T00:24:29+5:302015-08-14T00:34:55+5:30
लोणार तालुक्यातील घटना; अनुदानातून बांधलेल्या शौचालयाची भिंत अंगावर पडली.

भिंत कोसळून एक ठार
लोणार (जि. बुलडाणा) : तालुक्यातील गायखेड येथे अनुदानातून बांधलेल्या शौचालयाची भिंत अंगावर पडून ६0 वर्षीय इसम ठार झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३0 वाजता घडली. स्थानिक पंचायत समितीकडून १0 वर्षांपूर्वी निर्मल भारत योजनेतून २ हजार ५00 रुपये अनुदानावर बांधकाम केलेल्या शौचालयाची भिंत शौचास गेलेल्या ६0 वर्षीय कोंडूजी भानुदास उबाळे यांच्या अंगावर पडली. त्यामध्ये कोंडूजी उबाळे हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच तलाठी एम.एन.खांदे, मंडळाधिकारी विजय पोफळे, नंदकुमार डव्हळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. गत तीन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.