निधीअभावी घरकुलाव्ांर छताची प्रतिक्षा
By Admin | Updated: May 9, 2017 13:52 IST2017-05-09T13:52:37+5:302017-05-09T13:52:37+5:30
योजनेचा निधी तीन टप्प्यात देण्यात येत असल्याने अनेकांचे घरकूल अर्धवट अवस्थेत आहेत.

निधीअभावी घरकुलाव्ांर छताची प्रतिक्षा
जळगाव : निवाऱ्याची मूलभूत गरज पाहता शासन घरकूल योजना राबविते. मात्र या योजनेचा निधी तीन टप्प्यात देण्यात येत असल्याने अनेकांचे घरकूल अर्धवट अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे तालुक्यात खुद्द मुख्यमंत्र्यांच्याहस्ते घरकूल कामांचे उदघाटन करण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांचा याच भागात दुसरा दौरा होत असताना सुध्दा घरकुलाचे काम पूर्ण झाले नसल्याच्या तक्रारी घरकूल लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडल्या. घरकुलासाठी एकूण १ लाख ५० हजाराचा निधी देण्यात येत असताना या लाभार्थ्यांना आतापर्यंत फक्त ३० हजार रुपयेच देण्यात आले आहेत. हिच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सुध्दा आहे. आर्थिक परिस्थितीअभावी पक्के घर बांधता येत नसल्यानेच घरकुल लाभार्थी कुडा-मातीच्या घरात राहतात. मात्र प्रत्येकाला निवारा ही मूलभूत सुविधा मिळावी, यासाठी शासन घरकूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देते. मात्र शासनाच्या निकषाप्रमाणे या योजनेचा निधी तीन टप्प्यात जसे काम पूर्ण होईल त्याप्रमाणात देण्यात येतो. मात्र सुरुवातीला बांधकाम करण्यासाठी आर्थिक स्थिती नसल्याने लाभार्थ्यांना योजना असतानाही लाभ घेता येत नाही. जिल्ह्यात घरकुल योजनेचा निधी मोठ्या प्रमाणात येत असतानाही अद्याप अनेक घरकुलांचे काम प्रलंबित आहे.