शेतक-यांना प्रतीक्षा पीक विम्याच्या रकमेची
By Admin | Updated: June 14, 2016 02:09 IST2016-06-14T02:09:42+5:302016-06-14T02:09:42+5:30
२ लाख ७६ हजार शेतक-यांना मिळणार विमा.

शेतक-यांना प्रतीक्षा पीक विम्याच्या रकमेची
खामगाव : पीक विमा मंजूर होऊन दोन आठवड्याचा कालावधी लोटल्यानंतरही शे तकर्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी पसरली आहे. खरिपा तील मूग, उडीद या दोन्ही पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. सोयाबीनमध्ये सुद्धा उत् पादनाचा खर्च निघाला नाही. त्यामुळे शेतकर्यांना पेरणीच्या व्यवस्थेसाठी पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली. शासनानेही खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कापूस आदी िपकांसाठी पीक विमा मंजूर केला आहे. विविध पिकांच्या जोखीम स्तरानुसार शेतकर्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. खरिपातील पीक विम्याच्या दाव्याची रक्कम पेरणी पूर्वी मिळण्याची अपेक्षा शेतकर्यांकडून केली जाते. त्यानुसार कृषी विभाग विमा कं पन्यांकडे प्रस्ताव सादर करतो. विमा कंपनीने शेतकर्यांचा पीक विमा दोन आठवड्यां पूर्वीच मंजूर केला आहे. मात्र, शेतकर्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नाही. मृगनक्षत्र सुरु झाल्याने शेतकर्यांची बी-बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, अशी अपेक्षा शे तकर्यांकडून केली जात आहे.