१५ वर्षांची प्रतीक्षा संपली
By Admin | Updated: October 20, 2014 00:12 IST2014-10-20T00:12:04+5:302014-10-20T00:12:04+5:30
खामगाव विधानसभा मतदारसंघात १५ वर्षांनंतर भाजपचे यश, आकाश फुंडकर विजयी.

१५ वर्षांची प्रतीक्षा संपली
अनिल गवई/ खामगाव (बुलडाणा)
युवा उमेदवार आणि मोदींच्या जादूमुळे भारतीय जनता पक्षाला तब्बल १५ वर्षांनंतर आपल्या बालेकिल्ल्यावर पुन्हा कब्जा मिळविण्यात यश आले आहे. या मतदारसंघात पहिल्या फेरी पासून भाजपचे आकाश फुंडकर आघाडीवर होते. काँग्रेसच्या दिलीपकुमार सानंदा यांनी २१ पैकी कोणत्याही फेरीत मतांचा लीड कापला नाही. काही ठिकाणी ते आघाडीवर राहिले. मात्र, एकूण मतांची बेरीज कापण्यात अपयशी ठरल्याने सानंदा यांना दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले.
खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये काढय़ाची लढत झाली. मात्र, मोदी अस्त्रांपुढे सोळाव्या फेरीचा निकाल घोषित होत अस तानाच, दिलीपकुमार सानंदा यांनी शरणागती पत्करली. मतमोजणी केंद्राबाहेर येऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मतविभाजन आणि मोदी लाटेमुळे आपला पराभव झाल्याची कबुली दिली. दुसर्या फेरीअखेरीस दिलीपकुमार सानंदा तिसर्या स्थानावर होते. तिसर्या फेरीत त्यांनी भारिपच्या अशोक सोनोने यांच्यावर आघाडी घेत दुसरे स्थान पटकाविले. परंतु, सुरूवातीपासूनच आघाडीवर असलेल्या आकाश फुंडकरांच्या एकूण मतांशी बरोबरी करण्यात एकदाही त्यांना यश आले नाही. शेवटच्या फेरीसोबतच पोस्टल मतांमध्ये सानंदा कमालीचे माघारले गेले. तत्पूर्वी, अकराव्या फेरीमध्ये सानंदांनी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या फेरीतही त्यांना फुंडकरांच्या तुलनेत २३७४ मतांची पिछाडी होती. निवडणुकीत आकाश फुंडकर यांना ७१ हजार ८१९ मते मिळाली. तिसर्या स्थानी असलेले भारिपच्या अशोक सोनोने यांचा संघर्ष मोठा आहे. पराभवानंतरही सतत लोकांच्या संपर्कात व प्रचाराच्या धामधुमीतही लोकसेवेत कायम असलेले सोनोने विजयाप्रत पोहोचू शकले नाहीत. दोन दिग्गजांच्या लढतीत त्यांनी घेतलेली मते ही त्यांच्या लोकसवेची पावती आहेत.