वाघोरा ते सावखेड तेजन दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:32 IST2021-08-29T04:32:53+5:302021-08-29T04:32:53+5:30
राहेरी बु. : सिंदखेडराजा तालुक्यातील वाघोरा ते सावखेड तेजन रस्त्याची गत काही दिवसांपासून दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याची ...

वाघोरा ते सावखेड तेजन दुरवस्था
राहेरी बु. : सिंदखेडराजा तालुक्यातील वाघोरा ते सावखेड तेजन रस्त्याची गत काही दिवसांपासून दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगाव राजा यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
तालुक्यातील अनेक खेड्यांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची गत अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. खेडे गावातील ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांसह प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अनेकवेळा निवेदनेही देण्यात आली आहेत. मात्र, निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही. या रस्त्याचे अनेकवेळा निविदा निघाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आलेले नाही. तालुक्यावरून सावखेड तेजन, हनवतखेड, माहेरखेड, खामगाव, वाघोरा, सुलजगाव, चिंचोली या गावाला जोडला जाणारा हा रस्ता आहे.
मनसेने दिला आंदाेलनाचा इशारा
हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष नीलेश देवरे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे, मनविसे तालुकाध्यक्ष अंकुश चव्हाण, शिवादादा पुरंदरे, अभिजित देशमुख, महेंद्र पवार, घनश्याम केळकर, अंबादास डिघोळे व मोठ्या संख्येने मनसे सैनिक उपस्थित होते.