व्हॉट्सअपवर अश्लील मॅसेज टाकून बदनामी; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 13:53 IST2017-08-05T13:53:11+5:302017-08-05T13:53:11+5:30

व्हॉट्सअपवर अश्लील मॅसेज टाकून बदनामी; गुन्हा दाखल
डोणगाव : डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम आंधृड येथील
‘सरपंच’ या व्हॉट्सअप ग्रुपवर अज्ञात व्यक्तीने अश्लील मॅसेज टाकून
बदनामी केल्याची घटना २ आॅगस्टला घडली. याप्रकरणी ४ आॅगस्ट रोजी गुन्हादाखल करण्यात आला.
आंधृड येथे ‘सरपंच’ या नावाने व्हॉट्सअप ग्रुप बनविण्यात आलेला आहे.
त्यामध्ये आंधृड येथील एक महिला आहे. सदर ग्रुपवर महिलेचे छायाचित्र
टाकून त्याखाली एक मोबाईल नंबरवरुन अश्लील मॅसेज टाकण्यात आला आहे.
याबाबत आंधृड येथील महिलेने तक्रार केल्यानंतर ठाणेदार आकाश शिंदे
यांच्या मार्गदर्शनात पिएसआय विलास मुंढे यांनी सदर नंबरचा शोध घेतला.
सदर नंबर हरविल्याची नोंद मेहकर पोलिस स्टेशनला एक वर्षापूर्वीच करण्यात
आलेली असून, गु्रपमध्ये ज्या नावाने नंबर आहे त्या व्यक्तीजवळही मोबाईल
नसल्याने अज्ञात नंबर विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ नुसार
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिएसआय विलास मुंढे करीत आहेत.
(वार्ताहर)