सिंदखेडराजा तालुक्यात १३७ बूथवर पोहोचले मतदान यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:29 IST2021-01-15T04:29:19+5:302021-01-15T04:29:19+5:30
कोरोना संकटामुळे मागील वर्षी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका १२ डिसेंबरला जाहीर झाल्या होत्या. तेव्हापासून निवडणूक विभाग प्रत्यक्ष कामाला लागला आहे. ...

सिंदखेडराजा तालुक्यात १३७ बूथवर पोहोचले मतदान यंत्र
कोरोना संकटामुळे मागील वर्षी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका १२ डिसेंबरला जाहीर झाल्या होत्या. तेव्हापासून निवडणूक विभाग प्रत्यक्ष कामाला लागला आहे. तालुक्यात २५७ जागांसाठी ६०३ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, पोलिसांच्या अहवालानुसार तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या गावांपैकी २६ गावे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यात सिंदखेडराजा पोलीस स्टेशनअंतर्गत १७, किनगावराजा पोलीस स्टेशनअंतर्गत चार गावांचा समावेश आहे. या ४३ गावांत २०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
तीन ग्रामपंचायती अविरोध आहेत. मागील निवडणुकीत कंडारी ही एकमेव ग्रामपंचायत अविरोध निवडून आली होती. यंदा यात अधिक दोन ग्रामपंचायतींची भर पडली आहे. कंडारीसह हिवरा गडलिंग व आंबेवाडी अशा तीन ग्रामपंचायती यावेळी अविरोध झाल्या आहेत. त्यांची अधिकृत घोषणा निवडणूक निकालाच्या वेळीच होणार आहे.
या गावांत झालेले अविरोध सदस्य
भोसा, दत्तपूर, गारखेड, चिंचोली, सुलजगाव, मलकापूर पांग्रा येथे प्रत्येकी दोन, नाईकनगर, पिंपळगाव लेंडी, पळसखेड चक्का येथे प्रत्येकी तीन, पोफळ शिवणी, वसंतनगर, खामगाव, सायाळ, पिंपळखुटा येथे प्रत्येकी चार, शेंदूर्जन, दुसरबीड, विजोरा, हनवतखेड एक, भंडारी येथे पाच तर लिंगा येथे सहा ग्रामपंचायत सदस्य अविरोध झाले आहेत.