४९८गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST2021-01-15T04:28:57+5:302021-01-15T04:28:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला १ हजार ७९५ मतदान केंद्रांवर मतदान हाेणार आहे. जिल्ह्यात ...

४९८गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला १ हजार ७९५ मतदान केंद्रांवर मतदान हाेणार आहे. जिल्ह्यात ३ हजार ८९१ जागांसाठी ही निवडणूक हाेत असून ८८५ सदस्य बिनविराेध झाले आहेत. मतदानासाठी पथके रवाना झाली आहेत.
जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, आरडीसी दिनेश गीते यांच्यासह ६ एसडीओ, १३ तहसीलदार यांच्या नेतृत्वात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. १४ जानेवारीला १३ तहसीलमध्ये मतदानासाठी नियुक्त २१७१ मतदान केंद्राध्यक्ष, ६९१९ मतदान कर्मचारी, २०२९ शिपाई यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विविध वाहनाद्वारे हे कर्मचारी निर्धारित केंद्राकडे रवाना झाले. मध्यान्हपर्यंत ते केंद्रात दाखल झााले. एप्रिल ते डिसेंबरदरम्यान मुदत संपलेल्या ५२७ ग्रामपंचायतींसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २८ ग्रामंपचायती अविराेध झाल्याने प्रत्यक्ष ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान हाेणार आहे.
पोलीस बंदोबस्त
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाेन हजार २०० पाेलीस तैनात करण्यात येणार आहेत. जिल्ह्यासाठी १७० पाेलीस निरीक्षक, सहायक पाेलीस निरीक्षक तसेच २२०० पाेलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच गृहरक्षक दलाचे १००८ जवानदेखील बंदाेबस्तावर राहणार आहेत. एसआरपी, आरसीपीच्या सात प्लाटून नियुक्त करण्यात आल्या आहेत.
संवेदनशील गावांमध्ये चाेख बंदाेबस्त
जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये अतिरिक्त बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच या मतदान केंद्रांवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. काही गावांमध्ये गृहरक्षक दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. एसआरपी आणि आरसपीच्या प्लाटूनही तैनात ठेवण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
निवडणुकीशी संबधित प्रत्येक व्यक्तीने जसे अधिकारी, कर्मचारी मतदार यांनी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सर्व व्यक्तीच्या तापमानाची तपासणी करण्यात येणार आहे.
आवश्यकतेनुसार सॅनिटायझर, साबण व पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आले आहे तसेच मतदारांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
१८ जानेवारीला निकाल
जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार असून १८ जानेवारीला तहसील मुख्यालयी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मतदानाची तयारी पूर्ण
जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान हाेणार आहे. काेराेना संसर्गाविषयी सर्वच नियमांचे पालन करण्यात येणार आहे तसेच मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी, कर्मचारी साहित्य घेउन रवाना झाले आहेत. सर्व मतदारांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून मतदानाचा हक्क बजावावा.
- दिनेश गीते
निवडणूक निर्णय अधिकारी