४० ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:38 IST2021-01-16T04:38:35+5:302021-01-16T04:38:35+5:30
सिंदखेडराजा : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी शांततेत मतदान पार पडले. तालुक्यातील ४३ पैकी ३ ग्रामपंचायती अविराेध झाल्या ...

४० ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत
सिंदखेडराजा : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी शांततेत मतदान पार पडले. तालुक्यातील ४३ पैकी ३ ग्रामपंचायती अविराेध झाल्या आहेत, तसेच ६०३ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सकाळी तालुक्यातील बहुतांश केंद्रांवर मतदारांची गर्दी कमी हाेती. सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत केवळ १०.५ टक्के मतदान झाले हाेते, त्यानंतर मतदारांची संख्या वाढत गेली. दुपारी १.३० वाजता तालुक्यात ४७ टक्के मतदान झाले हाेते. तालुक्यात एकूण ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. मात्र, ३ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ४० ग्रामपंचायतींंसाठी मतदान झाले. १३७ बूथवर सकाळी मतदानास प्रारंभ झाला. तालुक्यात एकूण ६४ हजार ८३५ एकूण मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ३४ हजार ११५, तर महिला मतदारसंख्या ३० हजार ७२० इतकी आहे.
साखरखेर्डा येथे काही वेळ गोंधळ
साखरखेर्डा येथील उर्दू शाळेत सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदान चिन्ह अस्पष्ट दिसत असल्याचा आक्षेप घेण्यात आला. मात्र, अधिकाऱ्यांनी हा आक्षेप मतदान यंत्र प्रात्यक्षिक दाखवताना घेतला नसल्याने तो खाेडून काढला. मात्र, उमेदवार व मतदान प्रतिनिधी एकत्र नसल्याने शेवटी ज्या ठिकाणी मतदान होणार होते त्या कक्षात लाइटची व्यवस्था केल्यानंतर हा गोंधळ संपुष्टात आला.