आता मतदार याद्यामध्ये मतदारांचे मोबाइल नंबर!

By Admin | Updated: July 18, 2016 23:36 IST2016-07-18T23:36:32+5:302016-07-18T23:36:32+5:30

बुलडाणा नगरपालिका निवडणूकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील लाखो मतदारांच्या नंबरचा होईल समावेश.

Voters voters now have mobile number! | आता मतदार याद्यामध्ये मतदारांचे मोबाइल नंबर!

आता मतदार याद्यामध्ये मतदारांचे मोबाइल नंबर!

नीलेश शहाकार/ बुलडाणा
जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयात नगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या अपडेट करण्याचे काम सुरू आहे. बोगस मतदारांचे नाव मतदार याद्यामध्ये आल्यामुळे वारंवार दुरुस्ती झाल्यानंतरही बर्‍याच वेळा याद्यामध्ये चुका आढळून येतात. आता खर्‍या मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार याद्यांमध्ये मतदारांचे मोबाइल नंबरचा समावेश केला जाणार आहे.
मतदार यादीतील सर्व प्रकारच्या चुका दुरुस्त करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्या शुध्दीकरणाचा कार्यक्रम (एनईआरपी २0१६) जाहीर केलेला आहे. या मोहिमेनुसार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्ययावतीकरणचे काम तहसील कार्यालय तसेच मतदान केंद्र व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत सुरू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया बुलडाणा शहरातील २८ वार्ड व १४ प्रभागासाठी राबविली जात आहे. बुलडाणा शहर नगरपलिका अंतर्गत ६४ हजार मतदार आहे. शहरातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. यात बोगस मतदारांना हटविण्यात येत आहे.
निवडणूक प्रक्रिया हायटेक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून याद्यामध्ये मतदाराच्या नावांपुढे त्यांचा मोबाइल नंबर किंवा फोन नंबर नोंदविण्याचा आदेश आहे. यामुळे प्रशासन व उमेदवारांना मतदारांशी संपर्क करणे सोपे होणार आहे.

Web Title: Voters voters now have mobile number!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.