मलकापुरात मतदार जनजागृती रॅली

By Admin | Updated: September 25, 2014 01:15 IST2014-09-25T01:09:36+5:302014-09-25T01:15:02+5:30

१00 टक्के मतदानासाठी २000 विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती रॅलीचे आयोजन.

Voters' public awareness rally in Mallacapura | मलकापुरात मतदार जनजागृती रॅली

मलकापुरात मतदार जनजागृती रॅली

मलकापूर : राज्य निर्वाचन आयोगाच्या निर्देशानुसार स्विप-२ कार्यक्रम अंतर्गत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, १00 टक्के मतदारांनी निवडणुकीमध्ये मतदान करावे या उद्देशाने शहरात २४ सप्टेंबर रोजी सुमारे २000 विद्यार्थ्यांच्या सहभागाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस दिनेशचंद्र वानखडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सकाळी ८ वाजता नुतन विद्यालय मलकापूर येथून प्रारंभ झाला.
रॅलीमध्ये शहरातील नुतन विद्यालय, लि.भो. चांडक विद्यालय, गो.वि.म. विद्यालय, हिराबाई संचेती कन्या शाळा, जि.प. हायस्कुल, झेड.ए. उर्दू हायस्कुल, मौलाना आझाद न.प. हायस्कुल, म्युनिसिपल हायस्कुल या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासह उपविभागीय अधिकारी दिनेशचंद्र वानखडे, तहसिलदार रविंद्र जोगी, गटविकास अधिकारी आर.बी. गुजर, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.टी. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी एन.जे. फाळके व त्यांचे सहकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी वा.ज. तायडे, महसुल विभागाचे एन.डी. कुळकर्णी, एस.के. नारखेडे, संजय मार्गंंड, के.एम. हटकर, गोविंद वाघ, ए.पी. बाहेकर तसेच पोलीस, महसुल, आरोग्य, शिक्षण, विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी रॅलीमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला. संचालन व आभार प्रदर्शन एस.एस. जुनारे यांनी केले.

Web Title: Voters' public awareness rally in Mallacapura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.