ग्रामपंचायतकडून ग्रंथालयास ५ हजारांचा स्वेच्छा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST2021-02-05T08:33:23+5:302021-02-05T08:33:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क साखरखेर्डा : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय, मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताकदिन ...

ग्रामपंचायतकडून ग्रंथालयास ५ हजारांचा स्वेच्छा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय, मोहाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच अशोक रिंढे आणि ग्रंथालय अध्यक्ष कैलास रिंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामसेविका कल्पना पडघान, ग्रंथपाल ऋषिकेश रिंढे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रंथालय सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचनालयाला ५ हजारांचा निधी
वाचन संस्कृतीला हातभार लावणाऱ्या गावातील वाचनालयात पुस्तके आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. या उपलब्ध निधीद्वारे गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना महागड्या आणि उत्कृष्ट अशा पुस्तकांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. मोहाडीचे सरपंच अशोक रिंढे यांच्याकडून ग्रंथालय अध्यक्ष कैलास रिंढे, ग्रंथपाल ऋषिकेश रिंढे व ग्रंथालय सदस्य यांनी हा निधी स्वीकारला.
फोटो :---
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर निधीचा धनादेश देताना सरपंच अशोक रिंढे.