विवेकानंदचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर

By Admin | Updated: November 14, 2014 22:36 IST2014-11-14T22:36:42+5:302014-11-14T22:36:42+5:30

बुलडाणा जिल्ह्याचा हॉलीबॉल संघ विभागीय फेरीत विजयी.

Vivekanand volleyball team at the state level | विवेकानंदचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर

विवेकानंदचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरावर

हिवराआश्रम (बुलडाणा) : यवतमाळ येथे जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या १६ वर्षांखालील मुले व मुलींच्या पायका व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये हिवरा येथील विवेकानंद विद्यामंदिरच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तर गाठले आहे.
विवेकानंद विद्यामंदिरच्या मुलींच्या संघाने अकोला, वाशिम, अमरावती या संघांचा पराभव करुन विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे मुलींच्या संघाची अहमदनगर येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर संघामध्ये सुरभी धाडकर, अंजली वडतकर, प्रिती देवकर, कोमल दरेकर, मयूरी म्हस्के, शिवकन्या थोरहाते, शुभांगी काकडे, सोनाली सपकाळ, दिव्या इंगळे यांचा समावेश झाला आहे. राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेसाठी मुलांच्या संघामध्ये आकाश पडघान, मैत्रेय निकम, अजय गिर्‍हे या तिघांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Vivekanand volleyball team at the state level