विठ्ठल एक्स्प्रेस ३ जुलैला धावणार
By Admin | Updated: June 29, 2014 00:44 IST2014-06-28T22:31:09+5:302014-06-29T00:44:43+5:30
वारकर्यांचा संभ्रम दूर : आषाढी एकादशी १0 दिवसांवर

विठ्ठल एक्स्प्रेस ३ जुलैला धावणार
खामगाव: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी खामगाव व अमरावती येथून सोडण्यात येणार्या ह्यविठ्ठल दर्शन एक्स्प्रेसचे वेळापत्रक आज जाहीर झाले. रेल्वे प्रशासनाने आज जाहीर केल्यानुसार ३ जुलै रोजी खामगाव येथून पहिली फेरी पंढरपूरसाठी रवाना होणार आहे. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली असतानाही अमरावती व खामगाव येथून जाणार्या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर झाले नव्हते. त्यामुळे या एक्स्प्रेसला यावर्षी हिरवी झेंडी मिळणार की नाही, असा संभ्रम भाविकांमध्ये निर्माण झाला होता; मात्र आज उशिरा रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ३ जुलैला खामगाव येथून पहिली फेरी पंढरपूरसाठी रवाना होणार आहे. त्यानंतर पुढील चार दिवस प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे चार फेर्या विठ्ठल दर्शनाच्या धावणार आहेत. दरवर्षी पंढरपूर येथील आषाढी एकादशीची वारी करणार्या भाविकांची संख्या हजारोच्या घरात असते. त्यामुळे विदर्भातील भाविकांना पंढरीची वारी करता यावी, यासाठी स्व.रमेश कांडेकर व जलंब रेल्वे प्रवासी सेवा संघाने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे खामगाव तसेच अमरावती येथून पंढरपूर यात्रेसाठी स्वतंत्र रेल्वे गाडी सोडण्यात येत आहे. या ह्यपंढरपूर दर्शनह्ण यात्रा स्पेशल रेल्वेला ११ वर्ष पूर्ण होत आहे. दरवर्षी या विठ्ठल दर्शन यात्रा स्पेशल गाडीवर भाविकांची गर्दी वाढतच आहे. या माध्यमातून रेल्वेला लाखो रुपयांचे उत्पन्नसुद्धा मिळते. तर भाविकांना एस.टी.बसच्या तुलनेत रेल्वेने आरामदायी व स्वस्त प्रवास मिळत असल्याने भाविकांची यात्राही आरामदायी व सुखद होते. या ह्यविठ्ठल दर्शन एक्स्प्रेसनेह्ण पंढरपूरला जाणार्या भाविकांची वाढलेली संख्या पाहता खामगाव व अमरावती येथून एकूण १९ बोगीची एक्स्प्रेसच्या फेर्या वाढवून आता त्या चार करण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी १९ जुलै रोजी झालेल्या आषाढी एकादशीमुळे या एक्स्प्रेसची पहिली फेरी १३ जुलै रोजी, दुसरी १४ जुलै, तिसरी १६ तर चवथी १७ रोजी सोडण्यात आली होती; मात्र यावर्षी आषाढी एकादशी काही दिवसांवर आली असताना रेल्वेने वेळापत्रक जाहीर केले नव्हते. त्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.