वर्दडा येथील पारधी वस्तीवर हाणामारी, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:04+5:302021-07-04T04:24:04+5:30

साखरखेर्डा पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. वर्दडा येथील गीताबाई सुभाष पवार यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. ...

Violence at Pardhi settlement in Vardada, a serious one | वर्दडा येथील पारधी वस्तीवर हाणामारी, एक गंभीर

वर्दडा येथील पारधी वस्तीवर हाणामारी, एक गंभीर

साखरखेर्डा पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. वर्दडा येथील गीताबाई सुभाष पवार यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या भाचीचा विवाह वर्दडा येथीलच अजय विजय पवार (२४) याच्याशी झालेला आहे. अजय विजय पवार १ जुलै रोजी मद्यप्राशन करून गीताबाईच्या भाचीला मारहाण करत होता. त्यामुळे गीताबाई सुभाष पवार व त्यांचा भाऊ गणेश सुभाष भोसले हे दोघे त्याला समजावण्यासाठी गेले होते. तेव्हा अजय विजय पवार व विजय रामसिंग पवार या पितापुत्रांनी त्या दोघांना शिवीगाळ करत मारहाण करीत गणेश भोसलेला चाकू मारला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी पितापुत्रांना अटक केली आहे. त्यांना २ जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे, अरविंद चव्हाण, दिनेश चव्हाण, अनिल वाघ हे करीत आहेत.

Web Title: Violence at Pardhi settlement in Vardada, a serious one