लग्न सोहळ्यासाठीच्या नियमांचा भंग, वधू-वर पित्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:28+5:302021-04-23T04:37:28+5:30
गुरुवारी सिंदखेड येथे एक लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये नियमापेक्षा जास्त लोकांची उपस्थिती आढळून आली. सध्या लग्नसमारंभासाठी ...

लग्न सोहळ्यासाठीच्या नियमांचा भंग, वधू-वर पित्यांना दंड
गुरुवारी सिंदखेड येथे एक लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये नियमापेक्षा जास्त लोकांची उपस्थिती आढळून आली. सध्या लग्नसमारंभासाठी वधू-वर पक्षाकडील एकूण २५ व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे; पण हा नियम येथे पाळला गेला नाही. बोदवड तालुक्यातील वर तसेच सिंदखेड येथील वधूचा हा लग्न सोहळा होता. या लग्न सोहळ्यात घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असल्यामुळे सिंदखेड ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक लहासे तथा तलाठी अवघड यांनी वधू-वर पक्षाकडील दोघांकडून प्रत्येकी दहा हजाराचा दंड वसूल केला.
गावामध्ये कोरोना चाचणी चालू असताना ग्रामपंचायत द्वारा लग्नामध्ये उपस्थित वीस लोकांची तपासणी करण्यात आली. त्यांचे सर्वांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे संकट अधिक गडद होत असताना लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये उपस्थित असणारी मोठ्या प्रमाणातील गर्दी अनेक समस्या निर्माण करू शकते.