खोलीकरणातून गावे पाणीदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 03:16 PM2019-07-29T15:16:01+5:302019-07-29T15:16:09+5:30

जळगाव जामोद : गत वर्षीच्या तुलनेत जळगाव व संग्रामपूर तालुक्यात पाऊस कमी होवूनही पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे विहिरींचा जलस्तर वाढला आहे.

 Villages become waterenrich by water conservation works | खोलीकरणातून गावे पाणीदार!

खोलीकरणातून गावे पाणीदार!

googlenewsNext

- नानासाहेब कांडलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : गत वर्षीच्या तुलनेत जळगाव व संग्रामपूर तालुक्यात पाऊस कमी होवूनही पाणी फाऊंडेशनच्या कामामुळे विहिरींचा जलस्तर वाढला आहे. यामुळे गावकऱ्यांच्या चेहºयावर आनंद फुलला आहे. ४८ डिग्री तापमानात केलेल्या श्रमदानाचे फलीत झाले असा कृतार्थतेचा भाव या गावांमध्ये दिसून येत आहे. येत्या काही दिवसात वरुणराजाने साथ दिली तर ज्या गावामध्ये पाणी फाऊंडेशन अंतर्गत कामे झाली ती गावे खºया अर्थाने पाणीदार होणार आहेत.
जलगाव जामोद तालुक्यातील ५५ गावे तर संग्रामपूर तालुक्यातील ६० गावे यावर्षी पाणी फाऊंडेशनमध्ये सहभागी झाली होती. त्यापैकी अनुक्रमे ३५ व ३९ गावांनीच प्रत्यक्ष काम सुरु केले. जळगाव तालुक्यात २० गावांनी चांगले काम केले तर संग्रामपूरमध्ये सक्रिय राहणारी १८ गावे होती. त्यामध्ये चांगेफळ बु., उमरा पानाचे, सावळा, भीलखेड, पिंप्री कवठळ ही ५ गावे तालुकास्तरीय स्पर्धेत पात्र ठरली. तर जळगाव तालुक्यातील बांडा पिंपळ, काजेगाव, निंभोरा बु. व निंभोरा खु. ही ४ गावे तालुकास्तरावर पात्र ठरली. यापैकी बांडा पिंपळ हे जळगाव तालुक्यातील आदिवासी गाव राज्यस्तरावरील १५ गावांमध्ये पात्र ठरले आहे.
संग्रामपूर तालुक्यातील काकोडा, वानखेड, जस्तगाव, पंचाळा, वकाणा, काकणवाडा खुर्द, सालवन, सगोडा, एकलारा, सायखेड, पलसोडा, खळद बु., वरवट बकाल, नेकनामपूर, आलेवाडी, बावनबीर, अकोली, दुर्गादैत्य व धामणगाव या गावांनी पाणी फाऊंडेशनचे चांगले काम केले. जळगाव तालुक्यात पळसखेड, सुनगाव, जामोद, आसलगाव, सुलज, पळशी सुपो, हाशमपूर (वडगाव), हनवतखेड, राजुरा खुर्द, खांडवी, टाकळी खाती, पाटण (वडगाव), वडगाव पाटण या गावांनी सक्रिय राहत चांगले श्रमदान करीत व मशीनकाम करुन घेतले. जिल्हा समन्वयक प्रताप मारोडे यांच्या मार्गदर्शनात जळगाव तालुका समन्वयक ऋषिकेश ढोले, राहुल शिरसाट, वैभव गावंडे व संग्रामपूर तालुका समन्वयक विवेक वानखडे, सीमा उमाळे, गजानन ढोबाळे यांनी विशेष परिश्रम घेवून गावकऱ्यांना योग्य सूचना दिल्या. यातून गावे पाणीदार होण्यास मदत होत आहे.


मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट काम
यावर्षी पाणी फाऊंडेशनच्या कामाच्या कालावधीत नेमकी लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाली होती. त्यामुळे बहुतांश अधिकारी वर्ग या कामात व्यस्त होता. तसेच राजकीय क्षेत्रात वावरणारी नेतेमंडळी सुध्दा या निवडणुकीत कामात गुंतली असल्याने त्यांचे अपेक्षित सहकार्य पाणी फाऊंडेशनच्या कामाला मिळू शकले नाही असे असूनही गावकºयांनी मात्र आपली जिद्द कमी होवू दिली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या कामांचा गाजावाजा कमी झाला परंतु प्रत्यक्ष काम मात्र दुपटीने झाले. संग्रामपूर तालुक्यात श्रमदानाने ३५ हजार घनमीटर पेक्षा जास्त काम झाले. तर मशीनद्वारे साडेचार लाख ते पाच लाख घनमीटर काम झाले. जळगाव तालुक्यात श्रमदानाने सुमारे ९० हजार घनमीटरपेक्षा जास्त काम झाले तर मशीनद्वारे सुमारे ५ लाख घनमीटरची सीमा ओलांडली आहे.

Web Title:  Villages become waterenrich by water conservation works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.