हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे विखे पाटील यांचा शेगावात मुक्काम

By Admin | Updated: October 10, 2016 02:57 IST2016-10-10T02:57:01+5:302016-10-10T02:57:01+5:30

ऐनवेळी लातूर दौरा रद्द

Vikhe Patil's stay in Shagah due to helicopter failure | हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे विखे पाटील यांचा शेगावात मुक्काम

हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे विखे पाटील यांचा शेगावात मुक्काम

शेगाव (जि. बुलडाणा): राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील रविवारी काँग्रेसच्या स्वराज्य संकल्प अभियाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने शेगाव येथे आले होते. दरम्यान, शेगाव येथून परतत असताना त्यांचे हेलिकॉप्टर अचानक नादुरुस्त झाले. त्यामुळे त्यांना ऐनवेळी आपला लातूर येथील दौरा रद्द करून शेगाव मुक्कामी राहावे लागले.
बुलडाणा जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या काँग्रेसच्या स्वराज्य संकल्प अभियानाच्या उद्घाटनासाठी रविवारी काँग्रेस नेते मुकुल वासनिक, आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी ४ वाजता ना. पाटील लातूर येथे जाण्यासाठी निघाले; मात्र हेलिकॉप्टरमध्ये बिघाड आल्याने त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद विहार येथे मुक्काम केला.

Web Title: Vikhe Patil's stay in Shagah due to helicopter failure