शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

vidhan sabha 2019 : युतीचा गुंता; इच्छुकांच्या नजरा मुंबईकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 14:55 IST

क्षणोक्षणी मिळणाऱ्या विविध स्वरुपाच्या माहितीच्या आधारावर जागा वाटपाचा युतीचा तिढा कितपत सुटला याचे आकलन करण्यावर भर दिला जात आहे.

नीलेश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: १४ व्या विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे सध्या मुंबईतील घडामोडींकडे लक्ष लागून आहे. त्यातच काही इच्छूक सध्या मुंबईतच ठाण मांडून असून क्षणोक्षणी मिळणाऱ्या विविध स्वरुपाच्या माहितीच्या आधारावर जागा वाटपाचा युतीचा तिढा कितपत सुटला याचे आकलन करण्यावर भर दिला जात आहे.बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे युतीच्या ताब्यात असून तीन ठिकाणी भाजप तर दोन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात तशी गतवेळी युती फार्मात होती. यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा कौल नेमका काय राहतो, याबाबत उत्सूकता कायम आहे.गेल्या वेळी भाजपला सर्वाधिक २८ टक्के मते मिळाली होती तर सेनेला १९.२६ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे सात पैकी पाच विधानसभा मतदार संघामध्ये भाजप व शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. यात मलकापूरमध्ये, जळगाव जामोद आणि खामगावमध्ये भाजप तर मेहकर आणि सिंदखेड राजामध्ये शिवसेनेचा विजय झाला होता. या पृष्ठभूमीवर सध्या २०१९ मधील १४ व्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची समिकरणे काय ठरतात याकडे राजकीय जाणकारांसह निवडणूक रिंगणात उतरू इच्छिणाऱ्यांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे मुंबईत २३ सप्टेंबर रोजी भाजपच्या पार्लमेंट्री बोर्डाची बैठक होत असल्याने बुलडाण्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळेंसह अनेक राजकीय नेते हे मुंबईत डेरेदाखल होणार आहे. त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी मुंबईत राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या घडामोडी होणार असल्याचे संकेत मिळत आहे.दुसरीकडे शिवसेनेमधील काही इच्छुकही सध्या मुंबईत डेरेदाखल असून मोतोश्री तथा शिवसेना भवनामध्ये होत असलेल्या बारिकसारीक हालचालीकडे त्यांचे लक्ष लागून आहे. येणाºया दोन ते तीन दिवसात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत जिल्ह्यातील राजकीय नेत्यांशी झालेल्या चर्चेतून समोर येत आहेत. त्यातच बुलडाण्याचे खासदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव हे ही मुंबईत उद्या पोहोचणार आहेत. शिवसेनेचीही २३ सप्टेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

मेरीटमध्ये कोणता मतदारसंघ बसणार!बुलडाणा जिल्ह्यात भाजप शिवसेना युतीमध्ये सात पैकी चार जागा भाजप आणि तीन जागा शिवसेनेकडे कायम राहत आल्या आहेत. यंदा बुलडाण्याच्या जागेवर भाजपने लोकसभेच्या जागे बदलात दावा केला आहे. त्यामुळे बुलडाण्याची जागा नेमकी कोणाला सुटणार याबाबत उत्सूकता आहे. जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान, संबंधित मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली मते, प्रतिस्पर्ध्याला मिळालेली मते याचा विचार करून जागा नेमकी कोणाला सोडायची याचा मेरीट काढल्या जाण्याची शक्यता सुत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे बुलडाण्याचा नेमका मेरीट काय ठरतो याकडे सध्या लक्ष लागून आहे.

शिवसेनाही बुलडाण्यासाठी आग्रहीबुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा चारदा आमदार राहलेला आहे. गेल्या वेळचा अपवाद वगळता बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व राहलेले आहे. त्यामुळे बुलडाण्याची जागा ही शिवसेनेलाच सुटणार असल्याचा दावा येथून निवडणूक लढवू इच्छिणाºयांनी केला आहे.

भाजपची संघटनात्मक ताकद वाढलीबुलडाणा विधानसभा मतदारसंघाचा विचार करता येथे भाजपचे संघटन गतवेळपेक्षा मजबूत झाले आहे. शक्तीकेंद्र प्रमुख, पान प्रमुख यासह भाजपचे सक्रीय झालेले पदाधिकारी पाहता भाजपची फळी येथे मजबूत दिसते. त्यातुलनेत शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह अधिक असून तब्बल ३२ जण बुलडाण्यातून निवडणूकीसाठी इच्चूक असल्याचे समोर आले होते. त्यातच अमरावती विभागामध्ये भाजपच्या दृष्टीने जमेचा मतदारसंघ म्हणून बुलडाणा विधानसभेकडे पाहल्या जात आहे. त्यामुळे भाजपला बुलडाणा विधानसभा मतदार संघ सुटण्याची आशा भाजपातील इच्छुकांना आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019