VIDEO : भाजीपाल्यासारखी केली वन्यपक्ष्यांची विक्री
By Admin | Updated: January 7, 2017 19:39 IST2017-01-07T19:34:10+5:302017-01-07T19:39:26+5:30
नीलेश शहाकार , ऑनलाइन लोकमत बुलडाणा, दि. ७ - पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा नारा दिला जात असतानाच शहरात बºयाच ...

VIDEO : भाजीपाल्यासारखी केली वन्यपक्ष्यांची विक्री
नीलेश शहाकार , ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ७ - पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचा नारा दिला जात असतानाच शहरात बºयाच ठिकाणी रस्त्यावर बेकायदेशीररित्या खुलेआम तितर, बटेर(लावरी) या वन्यपक्षांची मांसाहारासाठी विक्री होत असल्याचे शनिवारी उघडकीस आले. जिल्ह्यात वनक्षेत्राचा मोठा भाग असलेल्यामुळे या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हीच बाब लक्षात घेऊन या वन्यपक्ष्यांना पकडण्याचे आणि त्यांची विक्री करण्याचा 'उद्योग' शहरात सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, या पक्ष्यांची शहरातील संगमचौक, जयस्तंभ चौक परिसरात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील या मुख्य चौकात सकाळी साधारण सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या सुमारास वन्यपक्षी विक्रेता दोन महिलांचा वावर होता. त्याच्याकडे प्रत्येकी १० वन्यपक्षी होते. नियमित ग्राहकांनी या महिलांशी संपर्क साधून आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी या वन्यपक्षांची खरेदी केली. हा व्यवसाय कायद धाब्यावर शहरात खुलेआम सुरु असून स्थानिक वनविभागाचे दुर्लक्ष आहे. हे विशेष.
असा ठरतो भाव..
ग्राहक जवळ आला की, सदर महिलेनी आपल्या झोळीतून या वन्यपक्षांची जोड काढून दाखवायची साधारणत: ५०० रुपये जोडीपासून भावबाजी सुरु होते. तितेर २०० ते २२० रुपये जोडी, बटेर (लावरी) १६० ते १८० रुपये जोडी विकली गेली. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पौष्टीक मांसाहाराची मागणी पुर्ण करण्यासाठी या छोट्या वन्यपक्ष्यांनाला लक्ष्य केले जाते.
अशाप्रकारे होते विक्री
१-स्थानिक संगम चौकात सदर पक्षी विक्री करतांना महिला आढळून आली.
२-प्रतिनिधीने या महिलेशी संपर्क साधून तीच्याकडील बटेर (लावरी) खरेदी
करण्याबाबत भावबाजी केली.
३-यानंतर १५० रुपये जोडी नुसार भाव निश्चित करुन तीन बटेर(लावरी) खरेदी
करण्यात आली.
४- विकत घेतलेल्या तीन लाव-या नजिकच्या वनक्षेत्रात सोडण्यात आल्या.
https://www.dailymotion.com/video/x844nk4