व्हिडीओ- संतनगरीत रंगला अनुपम्य सोहळा

By Admin | Updated: July 15, 2016 19:15 IST2016-07-15T17:11:40+5:302016-07-15T19:15:12+5:30

विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारक-यांनी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या सन्तनगरी शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा अनुभवला.

Video-intensive color is unmatched | व्हिडीओ- संतनगरीत रंगला अनुपम्य सोहळा

व्हिडीओ- संतनगरीत रंगला अनुपम्य सोहळा

ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. 15 - विठ्ठलनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारक-यांनी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या सन्तनगरी शेगावात आषाढी यात्रेचा अनुपम सोहळा अनुभवला. गजानन महाराजांच्या पंढरीत आषाढी एकादशी यात्रा सोहोळा शुक्रवारी लाखोच्या वर भाविकांच्या उपस्थितीत झाला. गजानन महाराजांनी पंढपुरात भक्त बापूना काळे यांना पाटील यांच्या वाड्यात (मठात) विठ्ठल रूपात दर्शन दिले. तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भक्त सरळ गजानन महाराजांच्या पंढरीत येऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात पाहून नतमस्तक होतात.
या गजरात अभंगाच्या सुरात आषाढी एकादशीला श्रीच्या पालखीचा नगर परिक्रमेने प्रारंभ झाला. संस्थानचे व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील याप्रसंगी प्रश्नमुख्याने उपस्थित होते. ह्यश्रीह्णची पालखी दत्त मंदिर, श्रीचे प्रगट स्थळ, महादेव मंदिर मागार्ने गेल्यावर, शिवशंकर हरिहर मंदिर, मारुती मंदिर या ठिकाणी विश्वस्तांच्या हस्ते विधिवत पूजा झाली. याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त श्रीकांतदादा पाटील, नारायणराव पाटील आदी उपस्थित होते. शेगाव:विदभार्ची पंढरी संतनगरी शेगावात श्री गजानन महाराज मंदिरात आषाढी एकादशीचा पारंपरिक सोहळा १५ जुलै रोजी साजरा पार पडला दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी शहरातून श्रींच्या पालखीची दुपारी २ वाजता नगर परिक्रमा करण्यात आली. दुपारी २ वाजता गज, अश्व, श्रींच्या रजत मुखवट्यासह शहर परिक्रमा करण्यात आली. ह्यश्रीह्णची पालखी फुलेनगर, श्रीचे प्रगटस्थळ, मारुती मंदिर, लायब्ररी, बाजार, व्यापारपेठ या मागार्ने नगर परिक्रमा करती झाली. बाजार, व्यापारपेठ या मागार्ने नगर परिक्रमा करती झाली. यावेळी सोहळ्यासाठी संतनगरीत भाविक भक्तांची मांदियाळी फुलली होती.शेगाव संस्थांच्या वतीने आषाढी एकादशीचा उत्सवही थाटामाटात व हजारो भक्तांच्या साक्षीने साजरा केल्या जातो.
संध्याकाळी श्रींच्या मंदिरात पोहचल्यानंतर आरती झाल्या नंतर टाळकऱ्यांचा 'रिंगण सोहळा' पार पडणार पडला. आषाढी एकादशी निमित्त दुपारी २ वाजता श्रींची पालखी, अश्व, गज, रथ, मेनासह नगर परिक्रमासाठी निघाली असता पालखीच्या अग्रभागी विठोबाची प्रतिमा असलेला गजराज व अश्व, पताकाधारी व विठ्ठलनामाचा, ज्ञानोबा तुकाराम गजाननाचा नामघोष करत संत नगरी दुमदुमली. भक्तीमय वातावरण निर्माण करणारा हा पालखी सोहोळा शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून सायंकाळी श्रींची पालखीची आरती झाली. श्रींच्या पालखीच्या मिरवणुकीने नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रमुख मार्गावर सुहासिनींनी सडा टाकून ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पुरुष व महिलांनी श्रींच्या पालखीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. आषाढी एकादशीनिमित्त शहरात महाप्रसाद म्हणून फराळांचे वाटप करण्यात आले तर सायंकाळी संसथान मधे कीर्तन झाले. शेगावात होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आले. शेगाव पोलीस स्टेशनचे ६0 कर्मचारी तसेच इतर २ अधिकारी, २0 कर्मचारी, १0 महिला कर्मचारी, १0 ट्राफिक पोलीस असा एकूण १00 कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय अधिकारी रूपाली दरेकर, शेगावचे ठाणेदार यशवंत बावीस्करयांनी चोख बंदोबस्त ठेवला.

 

Web Title: Video-intensive color is unmatched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.