अकोला : विदर्भ राज्य व आंतरजिल्हा वरिष्ठ कॅरम अजिंक्यपद-२0१४ स्पर्धा ९ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत श्रीविष्णू महेश भवन, अकोला येथे होणार आहे.पुरुष व महिला एकेरी, वरिष्ठ पुरुष व महिला एकेरी (५0 वर्षावरील), पुरुष व महिला आंतरजिल्हा सांघिक स्पर्धा या गटात होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंना राज्य स्पर्धा प्रवेशाबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल. या आधीच्या मानांकन स्पर्धा आणि या स्पर्धेतील कामगिरी यावर विदर्भ राज्य कॅरम संघाची घोषणा या स्पर्धेच्या अखेरीस होणार आहे. या स्पर्धेतून निवड झालेला विदर्भ राज्य संघ २४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत मुरादाबाद (उत्तर प्रदेश) येथे होणार्या वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होईल. विदर्भ कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अजहर हुसेन व ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष संदीप पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ कॅरम असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नाव नोंदणीसाठी २३ सप्टेंबर अंतिम तारीख आहे. अकोला जिलतील खेळाडूंनी जिल्हा समन्वयक विनया मुकादम, तनवीर खान, मोहन काजळे यांच्याशी संपर्क साधून, प्रवेश निश्चित करावा, अशी माहिती असोसिएशनचे सचिव प्रभजितसिंह बछेर यांनी दिली.
विदर्भ राज्य व आंतरजिल्हा वरिष्ठ कॅरम अजिंक्यपद स्पर्धा अकोल्यात
By admin | Updated: September 18, 2014 23:49 IST