उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 02:09 IST2017-01-05T02:09:12+5:302017-01-05T02:09:12+5:30

नऊ नगरपालिकांमध्ये निवड; बुलडाण्यात काँग्रेसला डावलून भारिपचा स्वीकृत सदस्य.

Vice President, Choice of approved members | उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्यांची निवड

उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्यांची निवड

बुलडाणा, दि. ४- जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड बुधवारी करण्यात आली. पीठासिन अधिकारी असलेल्या नगराध्यक्षांनी स्वीकृत सदस्यांची निवड केली.
जिल्ह्यात नऊ नगरपालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या २३ जागांसाठी ७६ जणांनी मंगळवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी या सदस्यांची निवड करण्यात आली. बुलडाणा येथे शिवसेनेचे विजय जायभाये यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर स्वीकृत सदस्यासाठी ऐनवेळेवर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे संजय गायकवाड, भारिपचे मो. सज्जाद व भाजपचे उदय देशपांडे यांची निवड करण्यात आली. चिखली नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी वजीराबी शे.अनिस यांची वर्णी लागली, तर स्वीकृत सदस्यपदी भाजपाचे पंडितराव देशमुख, अनुप महाजन व काँग्रेसचे सुनील कासारे यांची निवड करण्यात आली. मेहकर नगरपालिका उपाध्यक्षाची अविरोध निवड झाली. यामध्ये न.पा. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे जयचंद बाठिया, तर स्वीकृत सदस्यपदी विकास जोशी व अक्काबाई गायकवाड यांची अविरोध निवड करण्यात आली.
खामगाव येथील नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचे संजय (मुन्ना) पुरवार स्पष्ट बहुमताने निवडून आले. तसेच स्वीकृत नगरसेवकपदी भाजपातर्फे संदीप वर्मा आणि किशोर भोसले, तर काँग्रेसतर्फे सरस्वती खासणे यांची निवड झाली. शेगाव नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाच्या वर्षा धमाळ यांचा १४ विरुद्ध १0 मतांनी विजय झाला, तर स्वीकृतसाठी विजय देशमुख, प्रदीप सांगळे, शिवाजी बुरूंगले यांच्या नावावर संख्या बलानुसार तिघांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मलकापूरमध्ये उपाध्यक्षपदी हाजी रशिदखाँ जमादार, तर स्वीकृत सदस्य म्हणून भाराकाँचे नारायणदास निहलानी, दिलीप देशमुख व प्रा.डॉ.अनिल खर्चे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नांदुरा न.प.उपाध्यक्ष पदाच्या व स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीसाठी न.प.ची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी जवरे यांच्या अध्यक्षतेत न.प. सभागृहात घेण्यात आली. यामध्ये न.प. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे लालाभाऊ इंगळे यांची अविरोध, तर नामनिर्देशन सदस्यांच्या दोन पदांसाठी महेश चांडक व श्रीधर बुरुकले यांची निवड करण्यात आली.
जळगाव जामोद नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक मांगीलाल भंसाली हे विजयी झालेत .

नगरपालिका            पक्ष                 उपाध्यक्ष
बुलडाणा                 शिवसेना           विजय जायभाये
मेहकर                   शिवसेना           जयचंद बाठिया
चिखली                  भाजप              वजीराबी शे. अनिस
देऊळगाव राजा       शिवसेना           पवन झोरे
खामगाव               भाजप               संजय पुरवार
शेगाव                   भाजप               वर्षा धमाळ
नांदुरा                   शिवसेना            लाला इंगळे
मलकापूर              काँग्रेस               हाजी रशिदखाँ जमादार
जळगाव जामोद      भाजप              मांगीलाल भंसाली

Web Title: Vice President, Choice of approved members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.