शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजा तालुक्यामधील पशुवैद्यकीय दवाखाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

फिरत्या दवाखान्याकरिता दिलेली व्हॅनही निकामी दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. अनेक रुग्णालयांत ...

फिरत्या दवाखान्याकरिता दिलेली व्हॅनही निकामी

दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने केवळ शोभेची वस्तू बनले आहेत. अनेक रुग्णालयांत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुपालकांना आपल्या गुरांवर उपचार करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक पशुवैद्यकीय रुग्णालये बंद राहत असल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. दुसरबीड येथील पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये पशुधन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. या रुग्णालयात औषधांचाही तुटवडा असल्याने पशुपालकांना आपल्या गुरांवर खासगी पशुधन अधिकाऱ्यांकडून उपचार करून घ्यावे लागत आहेत. खासगी पशुवैद्यकीय अधिकारी पशुपालकाकंडून ३०० रुपये घेत आहेत. कृत्रिम रेतन करण्याकरितासुद्धा दोनशे रुपये द्यावे लागत आहेत. शासनाने मागे पशूचा सर्व्हे केला. आधार नोंदणी खासगी लोकांकडून करून घेण्यात आली. त्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये फी द्यावी लागली. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री पशू स्वास्थ्य योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च केले व पशुवैद्यकीय विभागाला फिरत्या दवाखान्याकरिता व लोकांना आपल्या जनावरांना योग्य उपचार मिळावा याकरिता एक व्हॅन दिली आहे; परंतु ही व्हॅन एका जागेवर धूळ खात पडून असून, याचा कोणताही उपयोग झाला नाही. रिक्त पदांसह सुविधांचाही वानवा असल्याने दुसरबीडसह सिंदखेड राजा तालुक्यातील पशुवैद्यकीय रुग्णालये शाेभेची वस्तू बनल्याचे चित्र आहे.