शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण करापासून दूर पळणाऱ्यांचे वाहन होणार जप्त         

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:05 IST

वाहनधारक पर्यावरण कर भरत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पर्यावरण करापासून दूर पळणाºयांचे वाहन जप्त करण्याच्या कारवाईचे आदेश उप प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी दिले आहेत.

बुलडाणा: परिवहन व परिवहनेत्तर (खाजगी) संवर्गातील वाहनांना २०१० पासून पर्यावरण कर लागू करण्यात आलेला आहे. खाजगी संवर्गातील वाहनांना १५ वर्षानंतर वाहनाचा प्रकार व इंधनानुसार पर्यावरण कर भरणे अनिवार्य आहे. परंतू वाहनधारक पर्यावरण कर भरत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पर्यावरण करापासून दूर पळणाºयांचे वाहन जप्त करण्याच्या कारवाईचे आदेश उप प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी दिले आहेत.वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने जुन्या वाहनांवर पर्यावरण कर लावला आहे. परंतू त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक वाहनधानरक पर्यावरण करापासून अनभिज्ञ आहेत. जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ८ आणि १५ वर्षांपेक्षा खासगी आणि व्यावसायिक वाहनांना पर्यावरण कर लागतो.  आॅक्टोबर २०१० पासून राज्यात सर्वत्र या निर्णयाची अंमलबजावणी झाली. शहरातील प्रत्येक वाहनांची नोंद असल्याने या कराच्या वसुलीची जबाबदारी राज्यातील प्रादेशीक परिवहन विभागाकडे आहे. मात्र, अनेक वाहनधारक कर भरत नसल्याचे चित्र आहे. पर्यावरण कराच्या वसुलीबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कडून पुन्हा एकदा कर वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नोंदणीनुसार सर्व प्रकारच्या खासगी आणि व्यावसायिक वाहनांकडून पर्यावरण कर वसूल केला जाणार आहे. त्यासाठी वाहनांची वर्गवारी करण्यात आली.  परिवहन व परिवहनेत्तर (खाजगी) संवर्गातील वाहनांना १५ वर्षानंतर वाहनाचा प्रकार व इंधनानुसार कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परिवहन संवर्गातील वाहनांना आठ वर्षानंतर वाहनाच्या प्रकार व वजनानुसार पर्यावरण कर भरणे आवश्यक आहे. सर्व वाहनधारकांनी  आपल्याकडे असलेल्या वाहनाच्या प्रकारातील वयोमानानुसार पर्यावरण कर तात्काळ न भरल्यास व अशा  वाहनांचा पर्यावरण थकीत असल्यास वाहनावर दंडाची व वाहन अटकावून ठेवण्याची कारवाई करण्याचे निर्देश उप प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी दिले आहेत. असा आहे वाहनांसाठी पर्यावरण करकार जीप (पेट्रोल) पाच वर्षाकरीता  तीन हजार रुपये, जीप डिझेल पाच वर्षाकरीता चार हजार रुपये, हलके मालवाहु वाहन पाच वर्षाकरीता  २ हजार ५०० रुपये, आॅटोरिक्षा पाच वर्षाकरीता ७५० रुपये, ट्रक जड वाहन वार्षिक कराच्या १० टक्के एक वर्षाकरीता, बस वार्षिक कराच्या २.५ टक्के एक वर्षाकरीता कर भरणे आवश्यक आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTaxकर