वाहन उलटले, वर-वधूसह १७ जण जखमी
By Admin | Updated: April 19, 2016 02:33 IST2016-04-19T02:33:55+5:302016-04-19T02:33:55+5:30
खामगाव तालुक्यातील घटना.

वाहन उलटले, वर-वधूसह १७ जण जखमी
खामगाव: लग्नसोहळा आटोपल्यानंतर परतीला निघालेल्या वर-वधूसह १७ जण वाहन उलटून जखमी झाले. ही घटना १८ एप्रिल रोजी संध्याकाळी खामगाव ते मेहकर मार्गावर टेंभूर्णा फाट्यावर घडली. जखमींवर स्थानिक सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. मोताळाच्या रमेश सुखदेव जाधव यांच्या उत्तम नामक मुलाचे १८ एप्रिल रोजी लोणार तालुक्यातील गुंधा येथील धोंडीराम दशरथ अविळे यांची मुलगी रेखा हिच्यासोबत लग्न पार पडले. लग्नसोहळ्यानंतर लग्नाचे वर्हाड वर-वधूसह क्रूझरने वराच्या घराकडे परत जात होते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते उलटले. यामध्ये वर उत्तम सुखदेव जाधव, वधू रेखा जाधव यांच्यासह धोंडाबाई सोना करविले (६0), आशा गुलाब सोनोने (१२ रा. वडोदा), लक्ष्मीबाई भिवराव करविले (४८),सोनाबाई सोमा करविले (२२), भीमराव करविले (५0 रा. कुर्हा काकोडा), आकाश महादेव वानखडे (२२ रा. जळगाव जा.), राधाबाई संजू करडे (९ रा.अलखेडा), बालाबाई समाधान अविळे (१७), पार्वताबाई केदारजी करडे (६0 रा. अलखेडा), बाळकृष्णा रमेश जाधव (१३ रा. पिं. नाथ), रमेश सुखदेव जाधव (६0 रा. पिं. नाथ), नर्मदाबाई सोनोने (५५ रा. वडोदा), बाळू सोमा करविले (५) गंगुबाई पुंडलिक अडोळे (४५), कमलाबाई दादाराव गुळधे (४0, रा.अलखेडा) असे १७ जण जखमी झाले. यातील आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.