वरखेडच्या जि.प.शाळेची आयएसओकडे वाटचाल

By Admin | Updated: March 2, 2016 02:22 IST2016-03-02T02:22:58+5:302016-03-02T02:22:58+5:30

वरखेड येथील लोकसहभागातून शाळेची भौतिक व शैक्षणिक प्रगती.

Varkheed ZP School will move to ISO | वरखेडच्या जि.प.शाळेची आयएसओकडे वाटचाल

वरखेडच्या जि.प.शाळेची आयएसओकडे वाटचाल

रमेश कणखर/ वरखेड (बुुलडाणा)
चिखली तालुक्यातील वरखेड येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ लोकसहभागातून शाळेची भौतिक व शैक्षणिक प्रगती साधत असून, आयएसओ नामांकनाकडे शाळेने वाटचाल सुरू केली आहे. सदर शाळा ही आयएसओ नामांकनाकडे वाटचाल करणारी विदर्भातील पहिली शाळा ठरणार आहे.
शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी ७0 हजार रुपये लोकवर्गणी जमा करून शाळेत ह्यबोलक्या भिंतीह्ण साकारल्या असून विद्यार्थ्यांंंनाच त्याचा फायदा होत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळा १00 टक्के प्रगत होण्याच्या वाटेवर असून, ते उद्दिष्ट लवकरच गाठले जाणार आहे. ज्ञानरचनावाद पद्धतीने विविध साहित्याच्या साहाय्याने अप्रगत विद्यार्थ्यांंंना प्रगत केल्याने शाळेने १0 जानेवारी २0१६ रोजी आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी नामांकन केले. पुढील वाटचाल जुळून आल्यास ही शाळा जिल्ह्यातून नव्हे, तर विदर्भातून जिल्हा परिषदेतील पहिली आयएसओ मानांकित शाळा बनणार आहे.
शाळेच्या प्रांगणावर ग्रामपंचायत व गावकर्‍यांच्या सहकार्यातून सुमारे १५00 वृक्षांची लागवड करण्यात येऊन, सुंदर असा बगीचा तयार करण्यात आला, तर झाडांना ठिबक तसेच तुषार संचाने पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुपारी विद्यार्थ्यांंंना देण्यात येणार्‍या पोषण आहारातील खिचडीसाठी लागणारा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने शाळेतच तयार करण्यात येतो. विद्यार्थ्यांंंंना व्यायामाची व कसरतीची गोडी लागावी म्हणून राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून सुमारे सहा लाख रुपयांची अद्ययावत व्यायामशाळा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, या शाळेला स्वच्छतेविषयीचा सन २0१४-१५ चा महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी स्वच्छ शाळा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

Web Title: Varkheed ZP School will move to ISO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.