वरवट येथे दोन ज्वेलर्सची दुकाने फोडली
By Admin | Updated: July 4, 2017 19:27 IST2017-07-04T19:27:28+5:302017-07-04T19:27:28+5:30
वरवट बकाल: येथील संग्रामपूर रोडवरील दोन ज्वेलर्सची दुकाने अज्ञात चोरट्यानी फोडली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

वरवट येथे दोन ज्वेलर्सची दुकाने फोडली
लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल: येथील संग्रामपूर रोडवरील दोन ज्वेलर्सची दुकाने अज्ञात चोरट्यानी फोडली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
चोरट्यांनी संग्रामपूर रोडवरील लक्ष्मी ज्वेलर्स आणि श्याम ज्वेलर्स या दुकांना लक्ष केले. यामध्ये दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करीत, सोन्या चांदीच्या दागीण्यासह रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गीते घटनास्थळी दाखल झाले होते.