काळ्या रंगाच्या साडीत सजविलेली गौरी व दिव्यांची सुंदर आरास याप्रसंगी करण्यात आली होती. अंजली परांजपे यांनी मकरसंक्रांतीचे महत्त्व स्पष्ट केले. १४ जानेवारीपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. दिवस मकरसंक्रांतीपासून हळूहळू मोठा होतो व रात्र लहान होत जाते. जानेवारी महिन्यात थंडी असल्याने तिळगुळाचे विशेष महत्त्व या सणाला आहे. संक्रांतीला महिला वाण वाटत असतात. योगांजली योग वर्गाच्या वतीने तुळशीचे रोप व गुलाबाची रोपे या प्रसंगी सुवासिनींना वाणात वाटण्यात आली. या कार्यक्रमाला योगवर्गाच्या समन्वयक गीता नागपुरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात कल्पना माने, ज्योती कर्दळे, नेहा अग्रवाल, ममता अग्रवाल, ममता अग्रवाल, खुशबू अग्रवाल, प्रीती अग्रवाल, कल्पना भगत, सपना अग्रवाल, शिल्पा अग्रवाल, भारती लाड, वसुधा शास्त्री, वर्षा जैन, स्मिता अग्रवाल, तारा जायभाये यांच्यासह परिसरातील महिलांनी सहभाग घेतला होता. तिळगूळ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
मकरसंक्रांतीनिमित्त दिले तुळशीचे वाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST