कवितांच्या प्रवासाला वऱ्हाडी मायबोलीची साथ - प्रवीण वानखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 05:56 PM2020-01-18T17:56:54+5:302020-01-18T17:56:59+5:30

- योगेश देऊळकार   लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा :   कविता करताना नेमकी ती कोणत्या भाषेत आहे, यावर तिचा सार अवलंबून ...

Varhadi Mayboli accompanies the journey of poetry - Praveen Wankhede | कवितांच्या प्रवासाला वऱ्हाडी मायबोलीची साथ - प्रवीण वानखडे

कवितांच्या प्रवासाला वऱ्हाडी मायबोलीची साथ - प्रवीण वानखडे

Next

- योगेश देऊळकार  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:   कविता करताना नेमकी ती कोणत्या भाषेत आहे, यावर तिचा सार अवलंबून असतो. आपल्याला लाभलेली आपली मायबोली भाषा म्हणजे जीवातील मोठी शिदोरी आहे. आपल्या कवितांच्या प्रवासालासुद्धा वºहाडी मायबोलीची साथ लाभली असल्याचे मत वºहाडी कवी प्रवीण वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.


कविता करण्याची आवड कशी निर्माण झाली?
सन २००८ मध्ये जळगाव जामोद तालुक्यातील चारबन येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला गेलो होतो. तेव्हा अजीबात स्टेज डेअरींग नव्हते. यावेळी प्रा. निळकंठ राठोड यांनी एनएसएसच शिबिर हेच स्टेज डेअरींग वाढविण्याचे व्यासपीठ असल्याचे सांगितले. या माध्यमातून माझी हिम्मत वाढली. तेव्हापासून नाटीकांमधील सहभागासोबतच समाजप्रबोधनाच्या दृष्टीने कविता करण्याचा प्रवास सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत आपण हा छंद जोपासात आहे. आणखी महत्त्वपूर्ण विषयांवर आपण कविता करत राहणार आहोत.


 कवितेसाठी वºहाडी भाषेचीच का निवड केली?
आपण राहत असलेल्या भागात प्रामुख्याने वºहाडी भाषा बोलली जाते. जी आपली मायबोली आहे, त्या भाषेत कविता केल्यास ती मनाला भिडते. ती निर्मितीही इतर प्रमाणित भाषेपेक्षा सरस असते. एवढेच नव्हे तर बोलीभाषेतील कविता लोकांना सहजपणे समजु शकतात. त्यातून हास्य निर्माण होते आणि कविता करण्यामागील उद्देश साध्य होण्यास मदत होते. 


आपण कोणत्या विषयांवर कविता करता?
शेतकरी आत्महत्या, हागणदरीमुक्त ग्राम, दारूबंदी, गुटखाबंदी, रुढी, परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयांवर समाप्रबोधन करणाºया कविता आपण प्रामुख्याने करतो. आणखी महत्त्वपूर्ण व नवनवीन विषयांवर कविता करण्याचा आपला मानस आहे. 

नवोदित कवींना आपण काय संदेश द्याल?
आजच्या तरुण पिढीमध्ये अनेक कलागुण दडलेले आहेत. मात्र आत्मविश्वासाची कमी असल्याने सर्व तरुण आपल्यातील कला, कौशल्य सादर करण्यासाठी समोर येत नाही. यामुळे तरुणांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आपल्याला अवगत असलेले कौशल्य सादर करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा. कवितेचेही अगदी तसेच आहे. एकदा कविता करायला सुरूवात केली की हळूहळू त्यातून नववीन कवितांचा जन्म होतो. कोणत्याही परिस्थितीवर टीका न करताना समाजाला एक नवी दिशा देण्याच्या दृष्टीने कवितांची निर्मिती करण्यावर भर द्यावा. त्यातून एक चांगला प्रभाव निर्माण होईल. पिढीवर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडत आहे. राहनीमानासह खानपानावरही याचे परिणाम दिसून येत आहेत. ही संस्कृती भावी पिढीसाठी मारक असून या संस्कृतीचे अनुकरण चुकीचे आहे. आपलीच संस्कृती कायम ठेवल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील

 

Web Title: Varhadi Mayboli accompanies the journey of poetry - Praveen Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.