शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

‘दरी तेथे बांध’ प्रकल्प कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 4:36 PM

‘दरी तेथे बांध’ या ३०० बंधाऱ्यांचा प्रोजेक्ट सध्या कागदावरच असून प्रकल्पासाठी निधीच उपलब्ध होऊ शकलेला नाही

- प्रविण खेते लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मेजर बेसीन बाऊंडीमध्ये असलेल्या बुलडाणा शहरालगतच्या अंजिठा पर्वतराजीमध्ये उभाण्यात येणाऱ्या ‘दरी तेथे बांध’ या ३०० बंधाऱ्यांचा प्रोजेक्ट सध्या कागदावरच असून प्रकल्पासाठी निधीच उपलब्ध होऊ शकलेला नाही. दुसरीकडे पालिका आणि स्थानिक आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यातील संघर्षामुळे बुलडाणा शहराच्या विकासाला खिळ बसल्याचे चित्र येथे निर्माण झाले आहे.परिणामी बुलडाणा शहरातील दलीत वस्ती योजनेतंर्गतची सुमारे साडेसहा कोटी रुपायंची कामे आ. सपकाळ यांनी केलेल्या तक्रारीमुळे रखडल्याचा आरोप शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक संजय गायकवाड यांनी केला आहे.बुलडाणा शहर तथा मोताळा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘दरी तेथे बांध’ या प्रकल्पामुळे बुलडाणा शहर परिसरासह वन विभागाच्या हद्दीत पाणी साठून जमिनीची धूप कमी होण्यासोबतच अवर्षण प्रवण मोताळा तालुक्यासाठीही त्याला लाभ होईल. सोबतच अ२िजंठा पर्वत रांगांमधील जैवविविधता टिकविण्यासही मदत होईल, असा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम होता. त्यासाठी गेली पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा आ. हर्षवर्धन सपकाळ करतात. सोबतच वनविभागासह जलसंधारण विभागाच्या विविध परवानग्यांची अडथळ््याची शर्यत पारकडून आता हा निर्णायक पातळीवर प्रकल्प आला आहे. मात्र त्यास निधीचीच तरतूद करण्यात आली नसल्याने हा प्रकल्प सध्या कागदोपत्रीच असल्याचे निदर्शनास येत आहे.दुसरीकडे गेल्या पाच वर्षात बुलडाणा पालिकेतील सत्ताधारी विरुद्ध आ. हर्षवर्धन सपकाळ असे चित्र सातत्याने दिसले आहे. या संघर्षात बुलडाणा शहरातील रस्ते विकासही खुंटल्याची जनसामान्यांची ओरड आहे. दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत बुलडाणा शहरात होऊ घातलेल्या कामांसंदर्भात आमदारांनी तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही कामेही रखडल्याचे बोलल्या जात आहे.या व्यतिरिक्त सुमारे ११९ कोटी रुपयांची खडकपूर्णा पाणीपुरवठा योजनाही अद्याप कार्यान्वीत झालेली नाही. या योजनेतंर्गत बुलडाणा शहरात करावयाच्या दोन टाक्यांची कामे तथा १४ चौरस किमी विस्तार असलेल्या बुलडाणा शहरातील योजनेतंर्गतची ८० ते ९० किमी लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामालाही मुहूर्त मिळालेला नाही, अशी ओरड होत आहे.त्यातच पालिकेतंर्गतच्या राजकारणात ‘बाण आणि खान’ चा प्रश्न उपस्थित करून वातावरण कलुशीत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा नगरसेवक संजय गायकवाड हे करीत आहेत.बुलडाणा शहराच्या विकासासाठी १५ ते २० कोटी रुपयांचा निधी देण्याचे प्रारंभी सांगण्यात येत होते. मात्र हा निधी पालिकेला मिळालाच नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. नितीन गडकरींनी तीन वर्षापूर्वी उद्घाटन केलेल्या बैतुल-अजिंठा रस्त्यातंर्गत असलेल्या देऊळघाट-बुलडाणा रस्त्याचेही उद्घाटन यांनी केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

बुलडाण्याच्या विकासाकडे स्थानिक आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे दुर्लक्ष होत आहे. बुलडाणा शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी प्रभावी प्रयत्न केलेले नाही. एचडीएफसी सह अन्य एका रस्त्याचे काम होणार असल्याचे कळताच त्यांनी या रस्त्याचे भूमीपूजन करून टाकले. वास्तविक राज्य सरकारच्या निधीमधून हे काम होत आहे.-संजय गायकवाड,उपजिल्हा प्रमुख तथानगरसेवक, बुलडाणा पालिका

‘दरी तेथे बांध’ या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. सुमारे १०० कोटी रुपयांचा तो प्रकल्प आहे. वन विभाग आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेचे सोपस्कार पूर्ण करून शासनाने त्याला मान्यता दिली. मात्र निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वीत झाला नाही. गेल्या पाच वर्षात ५०२ किलो मिटर रस्ते मतदारसंघामध्ये पूर्ण केले आहेत.-हर्षवर्धन सपकाळआमदार, बुलडाणा विधानसभा मतदारसंघ.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेस