सिंदखेडराजा परिसरात साकारत आहे वैष्णव गड!
By Admin | Updated: October 19, 2015 01:37 IST2015-10-19T01:37:27+5:302015-10-19T01:37:27+5:30
धार्मिक अधिष्ठानासह शेतक-यांचे आत्मबळ वाढविणारे केंद्र.

सिंदखेडराजा परिसरात साकारत आहे वैष्णव गड!
बुलडाणा : मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरापासून जवळच असलेल्या वैष्णव गड येथे धार्मिक अधिष्ठानासह शेतकर्यांचे आत्मबळ वाढविणारे केंद्र साकारत आहे. एकेकाळी उजाड माळराण असलेला वैष्णव गड आता हिरवाईने नटला आहे. विविध वनऔषधांसह शेतकर्यांना आत्मिक बळ देणारे मार्गदर्शन केंद्र म्हणून वैष्णव गडाची लवकरच या पंचक्रोशीत ओळख निर्माण झाली आहे. वारकरी असलेले हभप गुरुवर्य त्र्यंबक सानप गुरुजी यांनी या पंचक्रोशीमध्ये वारकरी धर्माची पताका फडकवत ठेवली आहे. लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतानाच या परिसरामध्ये अध्यात्मासोबतच आत्मबळ वाढविणारे केंद्र तयार व्हावे, असा संकल्प त्यांनी केला. या संकल्पाला ग्रामस्थांनी साथ दिली व अवघ्या पाच एकरावर वैष्णव गडाची पायाभरणी झाली.