सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:43+5:302021-02-05T08:32:43+5:30
कोविड १९ लसीकरणांतर्गत या ठिकाणी प्रथम एक हजार लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. ३० -३० मिनिटांच्या टप्प्यात दहा-दहा ...

सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
कोविड १९ लसीकरणांतर्गत या ठिकाणी प्रथम एक हजार लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. ३० -३० मिनिटांच्या टप्प्यात दहा-दहा व्यक्तींना ही लस देण्यात येणार आहे. हे शिबिर आठवड्यातील सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार असे चार दिवस सुरू राहणार आहे. लाभार्थ्यांना एसएमएस पाठवून शिबिराची दिनांक आणि वेळ कळविण्यात येईल. त्यानुसार लाभार्थ्यांनी आपल्या नियोजित वेळेवर हजर होऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र सुलतानपूरच्या वतीने करण्यात आले. लसीकरण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी अस्मिता तांबे, आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड, वैद्यकीय अधिकारी प्रल्हाद जायभाये, मंडळाधिकारी अंबादास चव्हाण, ग्रामविकास अधिकारी संतोष क्षीरसागर, तलाठी प्रमोद दांदडे, सरपंच चंद्रकला अवचार, माजी सरपंच विजय खोलगडे आदी उपस्थित होते. यावेळी लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ, नायब तहसीलदार हेमंत पाटील, मेहकर ठाण्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी भेट देत शिबिराचा आढावा घेतला. शिबिराच्या यशस्वीतेकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती आघाव, डॉ. स्वाती वाघ यांच्यासह प्रा. आ. केंद्राचे कर्मचारी, आशा, आंगणवाडी सेविका, मदतनीस आदींनी परिश्रम घेतले.