लसीकरणात जीवनावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांचा समावेश व्हावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:11+5:302021-04-08T04:35:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. ...

लसीकरणात जीवनावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांचा समावेश व्हावा !
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लसीकरणाची व्याप्ती वाढविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने जीवनावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना व त्यामध्ये कार्यरत नागरिकांना लसीकरण गरजेचे असल्याने जीवनावश्यक सेवाअंतर्गत कार्यरत व्यक्तींना वयाची अट न ठेवता लसीकरणात अंर्तभाव करून त्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी केली आहे.
सतीश गुप्ता यांनी यानुषंगाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढविताना सर्व जीवनावश्यक सेवा देणारे मेडिकल, डेअरी, किराणा, पेट्रोलपंप, बँक, पतसंस्था, विमा, पत्रकार या संस्था व आस्थापनातील सर्व व्यक्तींचा लसीकरणामध्ये वयाची अट न ठेवता तात्काळ समावेश करावा. सरकारने लसीकरण सर्वांना खुले केले तर त्यामध्ये काळा बाजार होऊ शकतो, तसेच मनुष्यबळाचाही तुटवडा आहेच. वरील सर्व आस्थापनांमधील कर्मचारीवर्ग कोरोना काळात गत वर्षभरापासून अविरत सेवा देत आहे. सेवा देत असताना अनेक व्यक्तींना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. म्हणूनच, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांना वयाची अट शिथिल करून तात्काळ लस देण्यात यावी, अशी मागणी दि.चिखली अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारकडे केली आहे.