शहर, तालुक्यात सात हजार लोकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:34 IST2021-04-08T04:34:58+5:302021-04-08T04:34:58+5:30
सिंदखेडराजा: सध्या शहर व तालुक्यात लसीकरण सुरू असून आतापर्यंत शहरात २ हजार ९०० तर ग्रामीण भागात ४ हजार ६०० ...

शहर, तालुक्यात सात हजार लोकांचे लसीकरण
सिंदखेडराजा: सध्या शहर व तालुक्यात लसीकरण सुरू असून आतापर्यंत शहरात २ हजार ९०० तर ग्रामीण भागात ४ हजार ६०० नागरिकांना लस देण्यात आली आहे. सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात १० दिवस पुरेल इतका तर प्राथमिक आरोग्य केंद्रावर ३ दिवस पुरेल इतका लस साठा उपलब्ध आहे.
सिंदखेडराजा शहरात ग्रामीण रुग्णालयात ४ जानेवारी पासून लसीकरण सुरू झाले आहे तर तालुक्यातील ग्रामीण भागात ९ मार्च पासून लसीकरण सुरू झाले असले तरीही लस घेण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत नाही. लस संदर्भात अनेक समज गैरसमज असल्याने अनेकजण लस घेण्याचे टाळत आहेत. सध्या शहरात फ्रंट लाईन वर्कर्स यांचे लसीकरण बंद आहे केवळ वय वर्ष ४५ पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींनाच लस दिली जात आहे. लसीबाबत सोशल माध्यमांवर येणाऱ्या वेगवेगळ्या माहितीच्या आधारावर नागरिक लसीबाबत आपला निर्णय ठरवित असल्याने मोठ्या प्रमाणावर लसीकरण होत नाही. दरम्यान आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती केली जात आहे तर सिंदखेडराजा शहरात लसीकरण संदर्भात पालिका स्तरावर दोन वेळा बैठका झाल्या असून जनजागृतीसह वाॅर्डनिहाय लसीकरण केले जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे या मोहिमेला देखील पाहिजे तितका प्रतिसाद मिळताना दिसत नाही. तालुका आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ महेंद्र साळवे व ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता बिराजदार यांनी नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.