सिंदखेडराजात ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:56+5:302021-03-04T05:05:56+5:30
सिंदखेडराजा : येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांच्या खंडानंतर कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे. बुधवारी पहिल्याचदिवशी ६४ जणांना कोरोनाची लस ...

सिंदखेडराजात ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरुवात
सिंदखेडराजा : येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांच्या खंडानंतर कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे. बुधवारी पहिल्याचदिवशी ६४ जणांना कोरोनाची लस देण्यात आली.
लस घेण्यासाठी सध्या ऑनलाईन नोंदणी करावी लागते. ज्यांना हे शक्य नाही, अशा ज्येष्ठांनी रुग्णालयात जाऊन आपल्या आधार, पॅनकार्ड सोबत नेऊन नोंदणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. यासाठी आपला मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. ज्यावर नोंदणीनंतर ओटीपी मिळणार असून, त्यानंतरच संबंधितांची लसीकरणासाठी नोंदणी होणार आहे. दरम्यान, सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या लसीकरण सुरू आहे. त्यामुळे याच सेंटरवर येऊन ज्येष्ठ नागरिकांना लस घ्यावी लागणार आहे. सोमवारी प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली असली, तरीही ऑनलाईन नोंदणीचे सर्व्हर डाऊन असल्याने व मंगळवारी संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण झाले नसल्याने बुधवारी येथे लसीकरण सुरू झाले.