कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय, काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:09+5:302021-08-28T04:38:09+5:30
चष्म्याला करा बाय बाय... कॉन्टॅक्ट लेन्सचे बरेच प्रकार आज उपलब्ध आहेत. कॉन्टॅक्ट लेन्सच्या ठरावीक किमती लेन्सच्या प्रकारानुसार आणि आवश्यक ...

कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय, काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा!
चष्म्याला करा बाय बाय...
कॉन्टॅक्ट लेन्सचे बरेच प्रकार आज उपलब्ध आहेत. कॉन्टॅक्ट लेन्सच्या ठरावीक किमती लेन्सच्या प्रकारानुसार आणि आवश्यक असलेल्या डॉक्टरांच्या नियमानुसार बदलतात. चष्मापासून सुटका म्हणून अनेक जण चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करत आहेत. चष्मा वापरणे अनेकांना आवडत नसल्यानेदेखील दृष्टी कमी झाल्याने कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण खबरदारी घेत उपयाेग करत आहे.
ही घ्या काळजी
रात्री झोपण्यापूर्वी लेन्सेस काढून ठेवणे डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. लेन्सेस रात्री झोपतानाही घातल्या गेल्या तर डोळ्यांमध्ये इन्फेक्शन हाेऊ शकते. लेन्सेस रात्री झाेपताना वापरल्यास डोळ्यांतील ‘कॉर्निया’मध्ये इन्फेक्शन होऊन ‘मायक्रोबियल केराटायटीस’सारखे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे काळजी घ्या.
नेत्रतज्ज्ञ म्हणतात...
काॅन्टॅक्ट लेन्स वापरणे काही हरकत नाही; परंतु जे आवश्यक काळजी घेऊ शकतात त्यांनीच याचा वापर करणे आवश्यक आहे. लेन्स काढ-घाल करताना खूप खबरदारी घेणे गरजेचे आहे. धूळ जाणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेऊ शकत असल्यास वापर याेग्य आहे.
- डॉ. शोण चिंचोले,
नेत्रतज्ज्ञ तथा फ्याको सर्जन, बुलडाणा