उडीद-मूग तोडणीला सापडेनात मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST2021-09-27T04:37:53+5:302021-09-27T04:37:53+5:30

बुलडाणा ते उंद्री रस्ता झाला निसरडा उंद्री : बुलडाणा ते उंद्री जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याचे काम सुरू आहे. ...

Urad-Moog harvester not found | उडीद-मूग तोडणीला सापडेनात मजूर

उडीद-मूग तोडणीला सापडेनात मजूर

बुलडाणा ते उंद्री रस्ता झाला निसरडा

उंद्री : बुलडाणा ते उंद्री जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याने वाहन चालकांना गाडी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेक अपघातही झाले असून, वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. आता पावसाची रिपरिप सुरू झाली असून, रस्ते निसरडे झाले आहेत. संबंधित विभागाने या रस्त्याची कामे करताना असलेला मुरूम लवकर उचलावा अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

--

धोकादायक झालेल्या इमारती जमीनदोस्त करा

लोणार : लोणार नगर परिषद हद्दीतील जुन्या झालेल्या जीर्ण इमारती लोणार नगर परिषदेने तत्काळ जमीनदोस्त कराव्यात, अशी मागणी लोणार नगर परिषदेचे नगरसेवक आबेद खान यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

कित्येक वर्षांचे जुने बांधकाम असलेल्या इमारतींना पावसाळ्यात सर्वाधिक धोका असतो. पावसाळ्यात अशा इमारती पडून कित्येकांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

Web Title: Urad-Moog harvester not found