समुपदेशनातून बारा ग्रामसेवकांना पदोन्नती

By Admin | Updated: November 21, 2015 01:57 IST2015-11-21T01:57:38+5:302015-11-21T01:57:38+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील बारा ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली.

Upgradation of 12 gramsevaks from counseling | समुपदेशनातून बारा ग्रामसेवकांना पदोन्नती

समुपदेशनातून बारा ग्रामसेवकांना पदोन्नती

बुलडाणा : स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात १९ नोव्हेंबर रोजी समुपदेशन प्रक्रिया राबवून जिल्ह्यातील बारा ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली. जिल्हा परिषद सभागृहात ही समुपदेशन प्रक्रिया जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ, सामान्य प्रशासन विभागाचे राजेंद्र पाटील व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विलास पुजारी यांच्या उपस्थित घेण्यात आली. प्राप्त आदेशानुसार एस.ओ.सांगळे, जी.आर ठाकरे, व्हि.एस.खोडके, बी.एस. बाहेकर, आर.डि.म्हस्के, एम.एस. डव्हाळे, टि.जी.चौधरी, आर.के. काळुशे, डि.बी.कोरे या नऊ ग्रामसेवकांची ग्रामविकास अधिकारी पदावर पदोन्नती झाली. तर स्पर्धात्मक परिक्षेतून के.के.शेगोकार यांची जमोद व ए.बी.मानकर यांची आसलगाव ता. जळगाव जामोद तसेच आर.यु.शेळके यांनी माटरगाव बु. ता.शेगाव येथे ग्रामविकास अधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली. बर्‍याच ठिकाणी ग्रामविकास अधिकार्‍यांचे पदे रिक्त असल्याचा मुद्दा जिल्हा ग्रामसेवक संघटनेनी उचलून धरला होता.

Web Title: Upgradation of 12 gramsevaks from counseling