अज्ञात वाहनाची धडक; दोन ठार

By Admin | Updated: September 24, 2016 02:34 IST2016-09-24T02:34:53+5:302016-09-24T02:34:53+5:30

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना.

An unknown vehicle; Two killed | अज्ञात वाहनाची धडक; दोन ठार

अज्ञात वाहनाची धडक; दोन ठार

खामगाव (जि. बुलडाणा), दि. २३- अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना पारखेड शिवारात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
सुटाळा बु. येथील पंजाबराव सदाशिव बोराडे (वय ३४) व श्रीकृष्ण शेषराव जुनारे (वय ३२) हे दोघे गुरुवारी रात्री मलकापूर येथून एमएच २८ एक्यू-६९६१ क्रमांकाच्या दुचाकीने सुटाळ्याकडे येत होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी दोघांचेही मृतदेह नांदुरा रोडवरील पारखेड शिवारात आढळून आले. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. सदर अपघात रात्री किती वाजता झाला, याबाबत कुणालाही माहिती नाही. दोन्ही मृतदेह व अपघातामध्ये क्षतिग्रस्त झालेली मोटारसायकल मध्यरात्रीनंतर पडून राहिली. सकाळीच काही नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यामुळे पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी शेषराव जुनारे (वय ६६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम २७९, ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: An unknown vehicle; Two killed