शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

बुलडाण्यात ‘स्वाभिमानी’चे अनोखे आंदोलन : पुरवठा अधिकार्‍यांच्या टेबलावर ओ तले पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:29 AM

बुलडाणा : स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गहू, तांदूळ  वाटप करण्यात आलेले नाही. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना वारंवार तक्रार,  निवेदन देऊनही पुरवठा अधिकारी यांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले नाही.  लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांतर्गत वेळेवर गहू व तांदूळ वाटप करण्यात यावे, या  मागणीसाठी सोमवारला स्वाभिमानी संघटनेच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या  टेबलावर पैसे ओतून अनोखे आंदोलन करण्यात आले. 

ठळक मुद्देलाभार्थ्यांना गहू, तांदूळ वाटप करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गहू, तांदूळ  वाटप करण्यात आलेले नाही. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना वारंवार तक्रार,  निवेदन देऊनही पुरवठा अधिकारी यांनी लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले नाही.  लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांतर्गत वेळेवर गहू व तांदूळ वाटप करण्यात यावे, या  मागणीसाठी सोमवारला स्वाभिमानी संघटनेच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या  टेबलावर पैसे ओतून अनोखे आंदोलन करण्यात आले. बुलडाणा शहरातील जोहर नगर, इकबाल नगर, मिर्झा नगर या परिसरातील नागरिकांनी  पुरवठा अधिकार्‍यांना गहू, तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मिळावे, यासाठी अनेक  विनंत्या केल्या; परंतु त्यांना उडवा-उडवीची उत्तरे मिळत होती. लाभार्थ्यांना स्वस्त धान्य  दुकानांतर्गत वेळेवर गहू व तांदूळ वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शे तकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष  शेख रफिक शेख करीम, तालुकाध्यक्ष हरिभाऊ उबरहंडे व तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव  यांच्या नेतृत्वात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या टेबलावर पैसे ओतले, पैसे घ्या, स्वस्त  धान्य दुकानदारांमार्फत गरजू लाभार्थ्यांंना दोन रुपये, तीन रुपये किलो गहू व तांदूळ  धान्याचे वाटप करा, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली. या  आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी दोन दिवसाच्या आत लाभा र्थ्यांना धान्य वाटप करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. जर नागरिकांना धान्य वाटप  करण्यात आले नाही, तर तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा  राणा चंदन यांनी पुरवठा अधिकार्‍यांना दिला. या आंदोलनात गजानन गवळी, सुभाष  हरमकार, वसीम बागवान, जावेद खान, मिस्कीन शाह, विजय बोराडे, गोपाल जोशी,  अजगर शाह, शेख साजीद, एकनाथ उबरहंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना