पोलिसांना गणवेश साहित्याऐवजी मिळणार गणवेश भत्ता
By Admin | Updated: August 28, 2014 02:20 IST2014-08-28T02:08:56+5:302014-08-28T02:20:47+5:30
पोलिसांना गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता दिला जाणार आहे.

पोलिसांना गणवेश साहित्याऐवजी मिळणार गणवेश भत्ता
खामगाव : पोलिस विभागातील पोलिस शिपायांसह सहायक पोलिस उपनिरिक्षकांना गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता दिला जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाने गणवेश वितरणाची प्रक्रीया सुलभ होणार आहे.
राज्य पोलिस दलातील पोलिस शिपायासह पोलिस उपनिरिक्षकांना गणवेशासाठी ५६ प्रकारचे साहित्य खरेदी करून वितरीत केले जायचे; मात्र हे साहित्य एकाच वेळी उपलब्ध होत नसल्याने गणवेश साहित्य वितरणात अडचणी येत होत्या. त्याअनुषंगाने आता पोलिसांच्या गणवेशासाठी लागणार्या ५६ पैकी २५ साहित्यासाठी भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. उर्वरित ३१ साहित्य प्रचलित पध्दतीनुसारच खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गणवेशाचा कापडा, बनियन, खाकी वुलन जर्सी, फटीग कॅप, वेगवेगळे बुट, सॉक्स, ब्लॅक कैप बटन, आर्म बॅचेस, नेमप्लेट, अँगोला शर्ट आणि पँट, रेनकोट, लेदर बेल्ट, खाकी वुलन ज्ॉकेट, शोल्डर बॅज, लाठी, बक्कल प्लेट आणि शोल्डर फ्लॅपसह २५ साहित्यासाठी भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील एक लाख २८ हजार ८३२ पोलिसांना गणवेशासाठी भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
*गणवेश वितरण प्रक्रीया सुलभ करण्यासाठी शासनाने गणवेश भत्ता वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईचा विचार केला, तर एका पोलिस कर्मचार्याला गणवेशासाठी जवळपास पाच हजार रुपये खर्च अपेक्षित असतो.