शेगाव नगरपालिका कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:26 IST2021-02-03T18:25:36+5:302021-02-03T18:26:03+5:30
Shegaon News नगरपालिका कार्यालयाच्या इमारतीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे एकच खळबळ उडाली.

शेगाव नगरपालिका कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
शेगाव : येथील गांधी चौकामध्ये असलेल्या नगरपालिका कार्यालयाच्या इमारतीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे एकच खळबळ उडाली. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करीत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.
शेगाव नगरपालिका कार्यालयात दररोजप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक अज्ञात समाजकंटकांनी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान नगरपालिका इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर दगडफेक केली. या घटनेमुळे नगरपालिका कार्यालयात उपस्थित कर्मचारी व इतर कामानिमित्त आलेल्या शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या निषेधार्थ नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे नगरपालिका कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे नागरिकांना परत जावे लागले. या घटनेच्या विरोधात शेगाव नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने शेगाव शहर पोलीस स्टेशनला जाऊन लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आली. या तक्रारीमध्ये नगरपालिका इमारतीवर दगडफेक करून प्रवेशद्वाराचे तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली.