४00 हेक्टरवर चराईबंदी
By Admin | Updated: August 26, 2014 22:20 IST2014-08-26T22:20:06+5:302014-08-26T22:20:06+5:30
ग्रामस्थांचा पुढाकार : वर्णा, लोखंडा गावाचा समावेश

४00 हेक्टरवर चराईबंदी
खामगाव : शंभर टक्के चराईबंदी करणार्या मांडणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत, खामगाव वन परिक्षेत्रातील वर्णा आणि लोखंडा या वनग्रामांनी ४00 हेक्टर परिक्षेत्रात चराई बंदी केली आहे. त्यामुळे मांडणीनंतर आता वर्णा आणि लोखंडा येथे हिरवळीचे क्षेत्र वाढविण्यास मदत होणार आहे.
खामगाव वन परिक्षेत्रातील मांडणी या वनग्रामामध्ये गेल्यावर्षी ३00 हेक्टरवर चराई आणि कुर्हाडबंदी करण्यात आली. यासाठी गावातील वन संरक्षण संयुक्त वन समितीची मदत घेण्यात आली. मांडणी येथील ८00 पैकी तीनशे हेक्टरवर चराईबंदीमुळे नैसर्गिक साधन संपत्ती वाढली आहे. नैसर्गिक साधन संपत्तीसोबतच वन विभागाच्या इतरही योजनांचा लाभ या वनग्रामाला मिळत आहे. त्यामुळे या गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत, वन परिक्षेत्रातील वर्णा आणि लोखंडा या वनग्रामामध्ये चराईबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दोन्ही गावातील संयुक्त वन समितीने पुढाकार घेतला असून, वर्णा येथे १५0 हेक्टरवर, तर लोखंडा येथे २५0 हेक्टर क्षेत्रावर चराईबंदी करण्यात आली आहे. या वनक्षेत्रात चराईबंदीमुळे हिरवळ जोपासण्यासोबतच जमिनीचा र्हास थांबविण्यासाठीही मदत होणार आहे.